आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकज अडवाणीला स्नूकरचे जगज्जेतेपद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हुरघादा(इजिप्त)- भारताचा पंकज अडवाणी याने स्नूकरचे १५ वे विश्वविजेतपद पटकावले आहे. क्यू कोर्ट विजेत्या पंकजने येथील सनराइज क्रिस्टल बे रिसॉर्टमध्ये पार पडलेल्या विजेतपदाच्या अंतिम लढतीत चीनच्या १८ वर्षांच्या झाओ चिनतोंगला ८-६ ने पराभूत केले.

पंकजने यापूर्वी सप्टेंबरमध्ये आयबीएसएफ जागतिक बिलियर्ड्सचे विश्वविजेतपेद मिळवले होते. एकाच वर्षी लाँग आणि शॉर्ट फॉरमॅटचे स्नूकरचे विश्वविजेतपद मिळवणारा पहिला खेळाडू अशीही त्याच्या नावे नोंद झाली आहे. २००३ मध्ये चीनमध्ये जगज्जेतेपद मिळवल्यानंतरचे त्याचे हे पहिले १५-रेड स्नूकर जेतेपद आहे. पंकजसाठी इजिप्त लकी ठरले आहे. गेल्या वर्षीही त्याने येथेच ६-रेड जागतिक विजेतपद पटकावले होते.