आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंकज अडवाणीने पटकावले कांस्यपदक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाेहा - भारताचा अव्वल खेळाडू पंकज अडवाणीने मंगळवारी अायबीएसएफच्या जागतिक स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. त्याला उपांत्य सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. वेल्सच्या अँड्य्रू फगेटने भारताच्या पंकजवर मात केली. त्याने ७-२ अशा फरकाने एकतर्फी विजय साकारून फायनल गाठली. पंकजला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने चांगली झुंज दिली. मात्र, चार तास रंगलेल्या या लढतीमध्ये त्याला समाधानकारक कामगिरी करता अाली नाही. त्याने सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेल्सच्या फगेटने सलग फ्रेम जिंकून सामन्यात अाघाडी मिळवली. हीच लय कायम ठेवताना त्याने पंकजला धूळ चारली.
बातम्या आणखी आहेत...