आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेपा अमेरिका चषक : पॅराग्वे सेमीफायनलमध्ये, ब्राझीलचे स्वप्न भंगले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काॅन्सेप्सिआॅन (चिली) - माजी विश्वविजेत्या ब्राझील टीमला रंगतदार सामन्यात पेनल्टी शूटआऊटचा चकव्यूह पुन्हा एकदा भेदता आला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पॅराग्वे टीमने कोपा अमेरिका चषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पाच वेळा विश्वविजेते राहिलेल्या ब्राझीलला शूटआऊटमध्ये ४-३ गोलने पराभूत केले. या शानदार विजयासह पॅराग्वेच्या संघाने उपांत्य फेरीत धडक दिली.

सामन्याच्या उत्तरार्धात मिळालेल्या पेनल्टीचे गोलमध्ये परिवर्तन करून पॅराग्वेचा स्ट्रायकर डेर्लीस गोंझालेझने संघाकडून खाते उघडले. याशिवाय याच गाेलच्या बळावर त्याने संघाला १-१ गोलने बरोबरीत आणून ठेवले. त्यामुळेच या अटीतटीच्या सामन्याचा निकाल लावण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करावा लागला.

शूटआऊटमध्ये पॅराग्वेचा कर्णधार राॅक सँटा क्रूझने चौथ्या स्पाॅट किकला बारच्या वर फटकारले. चौथ्या संधीत पॅराग्वेच्या डग्लस कोस्टाने मात्र गोल करून संघाला ३-३ गोलने बरोबरीत आणून ठेवले. त्यानंतर ब्राझीलच्या रिबेरोने संधी गमावल्यामुळेच ब्राझीलच्या हातून सामना निसटला. मात्र, पॅराग्वेच्या २१ वर्षीय गोंझालेझने पाचवी संधी न गमावता चेंडू गोलजाळ्यात धाडून संघाला ४-३ गोलने विजय मिळवून दिला. त्या वेळी आनंदात त्याचे सहकारी त्याच्याकडे धावत सुटले.

माझ्या संघ सहकाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. त्याला मोल नाही. आम्ही येथे आलो त्या वेळी कोणाचाही आमच्यावर विश्वास नव्हता. मात्र, आम्ही संघ भावनेने खेळतो आणि या स्पर्धेत देण्यासारखे आमच्याकडे आणखी बरेच काही आहे, असे मत गोंझालेजने विजयानंतर बोलताना व्यक्त केले.

ब्राझीलला सलग दुसऱ्यांदा धक्का
कोपा अमेरिका चषकात ब्राझीलची सद्दी गेल्या आठ वर्षांत काही जमू शकली नाही. पाच वेळा विश्वविजेता राहिलेल्या ब्राझीलला सलग दोनदा पॅराग्वेने कोपा अमेरिका चषकात उपांत्य फेरीपुढे सरकूच दिले नाही. यंदा हा संघ नियमित कर्णधार नेमारच्या अनुपस्थितीत खेळला.

एव्हर्टन रिबेरोमुळे ब्राझील बाहेर
ब्राझील संघाच्या एव्हर्टन रिबेरोने पेनल्टी शूटआऊटची संधी वाया घालवली. त्यामुळे ब्राझील संघ मागे पडला. मात्र, पॅराग्वेच्या डग्लस कोस्टाने या दरम्यानन मिळालेल्या संधीचे सोने करून शूटआऊटमध्ये चेंडू सहज गोलमध्ये धाडला. या सलग दोन पराजयांच्या स्मृती ब्राझीलच्या संघासाठी फारच कटू ठरणाऱ्या अाहेत.
बातम्या आणखी आहेत...