आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाल्कनीतून पडल्यानंतर ८० टक्के पॅरालाइज्ड, आता आहे मॅरेथॉनपटू; ४० देशांत योगही शिकवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - लंडनची टिफेनी जॉयनर बाल्कनीतून पडल्यानंतर तिच्या कमरेखालच्या शरीरात अर्धांगवायू झाला. यापुढे चालू शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, आता ती मॅरेथॉनपटू असून, योगगुरूसुद्धा आहे. लांब पल्ल्याच्या शर्यतीत सहभागी होऊन ती चॅरिटीसाठी पैसे गोळा करते. आतापर्यंत तिने ४० देशांत हजारो लोकांना योग शिकवला.

गोष्ट आहे २००८ ची. जॉयनर दुबईत फिरायला गेली होती. एका हॉटेलच्या २५ फूट उंच बाल्कनीतून ती पडली. तिच्या मणक्याचे हाड मोडले. आता ती स्वत:च्या पायावर चालू शकणार नाही अाणि तिला नेहमी अंथरुणावर राहावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. तिचे ८० टक्के शरीर पॅरालाइज्ड झाले होते. मात्र, ती यामुळे दु:खी झाली नाही. या दुबळ्या बाजूला तिने वरचढ होऊ दिले नाही. जखमी होण्याआधीच तिने योगशिक्षकाची पदवी मिळवली होती. तिने पुन्हा योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. एक पर्सनल ट्रेनरही ठेवले. सुरुवातीला तिला खास यश मिळाले नाही. जाॅयनरने ट्रेनरसोबत रिकव्हरी प्लॅन तयार केला. याचे कठोर पालन करण्यात तिने सुरुवात केली. दिवसांतील काही मिनिटे तिने चालण्यास सुरुवात केली. जॉयनरला नीट चालता येत नव्हते. पाय लडखडत होते. मात्र, ती हरली नाही. योग केल्याने तिला खूप फायदा झाला. व्हीलचेअरच्या जागी वॉकरचा उपयोग सुरू केला. यानंतर क्रचेसही उपयोगात आणले. आता ती पायात ब्रेसेस लावून चालते. यानंतर तिच्या पायावर शस्त्रक्रियासुद्धा झाली. पायांतील हाडांत इन्फेक्शन झाल्यामुळे अंगठे कापावे लागले. स्पाइनला मदत करण्यासाठी मेटल रॉड टाकण्यात आले. यानंतर तिने योगाशिवाय धावण्यास सुरुवात केली. छोट्या अंतराने सुुरुवात केली आता ती लांब पल्ल्याच्या स्पर्धेत धावते.
जॉयनर म्हणाली, “माझ्या जीवनातील हा खूप कठीण काळ होता. यामुळे माझे जीवन बदलले. मी या घटनेला कधीच विसरू शकत नाही. योगामुळे मला खूप फायदा झाला. यामुळे माझ्यासारख्या गरजू लाेकांना मी योग शिकवण्याचे ठरवले. मी यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली. त्याच्या मदतीने मी लोकांशी संलग्नित होऊ शकली. आतापर्यंत मी ४० देशांत लोकांना योग शिकवले आहे. यात बहुतेक पॅरालाइज्ड लोकांचा समावेश आहे.’
बातम्या आणखी आहेत...