आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडूंच्या चित्तथरारक प्रदर्शनाने मैदान गाजवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि औरंगाबाद क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत दुसऱ्या दिवशी पुणे विभाग, नाशिक विभाग आणि मुंबई विभागाच्या खेळाडूंनी थरारक कामगिरीने सर्वांचे लक्ष्य वेधले.

विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या स्पर्धेत १७ वर्षांखालील ४०० मीटर शर्यतीत नाशिकच्या ताई बामणेने ५९.०५ सेकंदांसह सुवर्ण पटकावले. क्रीडापीठाची संगीता शिंदे ५९.९ सेकंदांसह रौप्यपदक तर नाशिकच्याच राधिका बाविस्करने ६८.५ सेकंदांत कांस्यपदक जिंकले. मुलांमध्ये मुंबईच्या यश श्रॉफने (५१.९ से.) क्रीडपीठाच्या संदीप पाडवीने (५२.५ से.)मागे टाकत सुवर्ण जिंकले.
रिले स्पर्धेत कोल्हापूरच्या मुलींनी मारली बाजी
मुलींच्या ४ बाय १०० मी. रिले स्पर्धेत कोल्हापूरच्या संघाने ५२.२ सेकंदांत सुवर्ण तर मुंबई संघाने रौप्यपदक आपल्या नावे केले. कोल्हापूर संघात ऋतुजा घराळ, रसिका पाटील, प्रेमा पाटील व स्वाती पाटील यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...