आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाेलंड शूट‘अाऊट’, पाेर्तुगाल टीमची सेमीफायनलमध्ये धडक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मार्सेल्लीई- स्टारखेळाडू क्रिस्टियानाे राेनाल्डाेने पाेर्तुगाल टीमने युराे चषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांंत्य फेरीत धडक मारली. पाेर्तुगालने उपांत्यपूर्व सामन्यात पाेलंडचा शूटअाऊटमध्ये पराभव केला. राेनाल्डाेच्या पाेर्तुगाल टीमने ५-३ अशा फरकाने शूटअाऊटमध्ये रंगतदार सामना जिंकला. या विजयाच्या बळावर पाेर्तुगालने अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित केला. निर्धारित वेळेपर्यंत ही लढत १-१ ने बराेबरीत राहिली हाेती. त्यानंतर या सामन्याचा निकाल शूटअाऊटमध्ये लागला. युवा खेळाडू रेनाताे सांचेझ हा पाेर्तुगालच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने शानदार गाेल करून टीमला अटीतटीच्या सामन्यात बराेबरी मिळवून दिली. त्यानंतर पेनल्टी शूटअाऊटमध्येही एका गाेलचे याेगदान दिले. यासह पाेर्तुगाल संघाला अापली अागेकूच कायम ठेवता अाली.
पाेलंड संघाने उपांत्यपूर्व सामन्यात दमदार सुरुवात केली. स्ट्रार स्ट्रायकर राेबर्ट लेवानदाेवास्कीने संघाकडून अवघ्या दुसऱ्या मिनिटाला गाेलचे खाते उघडले. यासह पाेलंडला १-० ने सामन्यात अाघाडी घेता अाली. यासह पाेलंडने अापल्या विजयाच्या अाशा पल्लवित केल्या. मात्र, या टीमला अाघाडीचा हा अानंद फार काळ टिकवून ठेवता अाला नाही. कारण, पिछाडीवर पडलेल्या पाेर्तुगालने दमदार पुनरागमन केले. यासह या संघाने सामन्यात बराेबरी साधली. बायर्न म्युनिखच्या १८ वर्षीय सांचेझने पाेर्तुगालसाठी चमत्कारी खेळी केली. त्याने केलेल्या शानदार गाेलच्या बळावर पाेर्तुगालला सामन्यात १-१ ने बराेबरी साधता अाली. मात्र, त्यानंतर तब्बल ९० मिनिटांपर्यंत दाेन्ही संघांना अाघाडी घेता अाली नाही. त्यामुळे निर्धारित वेळेपर्यंत ही लढत बराेबरीत राहिली हाेती.

पॅट्रिसियाे, क्वारेस्मा ठरले विजयाचे हीराे
पाेर्तुगालसंघाच्या विजयात गाेलरक्षक रुई पॅट्रिसियाे रिकार्डरे क्वारेस्मा हे हीराे ठरले. गाेलरक्षक पॅट्रिसियाेने चाैथ्या प्रयत्नात पाेलंड टीमच्या याकूबचा गाेल करण्याचा प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर क्वारेस्माने पाेलंडच्या गाेलरक्षक लुकासला हुलकावणी देत चेंडू गाेलपाेस्टमध्ये टाकला. यासह त्याने विजय निश्चित केला.
बातम्या आणखी आहेत...