आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोनाल्डो, नानीच्या कामगिरीनेे पोर्तुगालची फायनलमध्ये धडक, बेलच्या वेल्सला २-० ने हरवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लियोन - सुपरस्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लुईस नानी यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलच्या बळावर पोर्तुगालने युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये वेल्सला २-० ने हरवले. या विजयासह पोर्तुगालने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमध्ये पोर्तुगालचा सामना दुसऱ्या सेमीच्या फ्रान्स-जर्मनी यांच्यातील विजेत्याशी होईल.
पोर्तुगाल-वेल्स सामन्याचा पहिला हाफ अत्यंत संघर्षपूर्ण झाला आणि एकाही संघाला गोल करण्यात यश मिळाले नाही. दुसऱ्या हाफमध्ये रोनाल्डोने आपली जादू दाखवली. त्याने सामन्याच्या ५० व्या मिनिटाला शानदार खेळ करताना पोर्तुगालचे खाते उघडले. रोनाल्डोने रफेल गुईरेरोच्या कॉर्नर किकवर शानदार हेडर मारून गोल केला. याच्या अवघ्या तीन मिनिटांनंतर लुईस नानीने वाएने हेनेसेला चकवताना चेंडू फिरवून गोल केला. या गोलसह पोर्तुगालने सामन्यात २-० अशी आघाडी घेतली.

रिअल माद्रिद संघात रोनाल्डोचा सहकारी खेळाडू गॅरेथ बेल या सामन्यात विशेष कामगिरी करू शकला नाही. वेल्सला निलंबित आरोन रामसे आणि बेन डेव्हिस यांची उणीव प्रकर्षाने जाणवली. या दोघांच्या अनुपस्थितीत वेल्सचे डिफेन्स आणि सुरक्षा फळी, मिडफील्ड दुबळे ठरले. पोर्तुगाललासुद्धा विल्यम कारवेल्हो आणि जखमी पेपेच्या अनुपस्थितीत मैदानावर खेळावे लागले. मात्र, रोनाल्डोने त्यांची उणीव भरून काढली. सामन्याच्या ७२ व्या मिनिटाला रोनाल्डोला येलो कार्ड दाखवण्यात आले. यानंतर ८८ व्या मिनिटाला सुपरस्टार गॅरेथ बेलला फाऊलमुळे यलो कार्ड दाखवण्यात आले. सामन्यात चाहत्यांना वेल्सचा गॅरेथ बेल आणि पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो या दोन दिग्गज खेळाडूंत झुंज बघायला मिळेल, असे वाटत होते. मात्र, तसे घडले नाही. रोनाल्डोने एकट्याने सामना गाजवला आणि पोर्तुगालला फायनलमध्ये थाटात पोहोचवले. सामना संपल्यानंतर रोनाल्डोने बेलचे सांत्वन केल्याचे चित्र सर्वांनी पाहिले.

रोनाल्डोने केली प्लातिनीची बरोबरी
या सामन्यात एक गोल करून सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डोने युरो कपमध्ये सर्वाधिक गोल करण्यात फ्रान्सचा दिग्गज खेळाडू प्लातिनीची बरोबरी केली. दोन्ही खेळाडूंच्या नावे प्रत्येकी ९ गोल आहेत.

सामन्यातील आकडेवारी
पोर्तुगाल स्टॅट वेल्स
०२ गोल ००
४६% बॉल पोझिशन ५४%
८३% यशस्वी पास ८९ %
४०६ एकूण पास ५१७
१७ अटेम्पट ०९
०६ ऑन टार्गेट ०३
०६ कॉर्नर ०२

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...