आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिकमध्ये सानियासोबत सोलापूरची प्रार्थना ठोंबर खेळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - साेलापूरची युवा टेनिसपटू प्रार्थना ठाेंबरे अागामी रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार अाहे. तिची महिला दुहेरीतील जगातील नंबर वन टेनिसपटू सानिया मिर्झाने निवड केली अाहे. त्यामुळे अाता महिला दुहेरीत सानिया अाणि प्रार्थना जाेडी अाॅलिम्पिक स्पर्धेच्या महिला दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार अाहे. याची शनिवारी अधिकृत घाेषणा हाेईल. यासाठी अखिल भारतीय टेनिस महासंघाची बैठक अायाेजित करण्यात अाली. येत्या ५ अाॅगस्टपासून ब्राझीलमध्ये रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेला सुरुवात हाेणार अाहे.
साेलापूरच्या प्रार्थनाने यापूर्वी सानिया मिर्झासाेबत अाशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावले अाहे.

बाेेपन्नाची साकेतला पसंती : राेहन बाेपन्नाने अनुभवी खेळाडू पेसला डावलून दुहेरीतील खेळाडू निवडल्याची चर्चा अाहे. यासाठी त्याने साकेत मिनेनीची पसंती दर्शवली अाहे. त्याला थेट रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेत प्रवेश मिळाला अाहे. त्याला खेळाडूची निवड करण्याचीही संधी अाहे.

बाेपन्नाची कानउघाडणी : राेहन बाेपन्नाने अाॅलिम्पिकसाठी साकेतला सहकारी म्हणून निवडण्याचे संकेत दिले अाहेत. मात्र, त्याला अनुभवी व सात वेळच्या अाॅलिम्पियन पेसला डावलून असा निर्णय घेता येणार नाही, अशा शब्दांत एअायटीएने बाेपन्नाची कानउघाडणी केली.

सानियाने दिला काैल : जगातील नंबर वन सानिया मिर्झाने रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेसाठी साेलापूरच्या प्रार्थनालाच काैल दिला.

महाराष्ट्राची पहिली टेनिसपटू
अाॅलिम्पिक स्पर्धेतील टेनिस प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणारी प्रार्थना ठाेंबरे ही पहिली महाराष्ट्रीय टेनिसपटू ठरणार अाहे. क्रमवारित अव्वल स्थानावर असलेल्या साेलापूरच्या प्रार्थनाला करिअरमध्ये प्रथमच अाॅलिम्पिक स्पर्धेत नशीब अाजमावण्याची संधी मिळाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...