आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रार्थनाने पटकावला अायटीएफचा किताब; करिअरमध्ये पहिल्यांदा महिला दुहेरीचे विजेतेपद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालिकाप्पन - साेलापूरची युवा खेळाडू प्रार्थना ठाेंबरे शनिवारी अायटीएफ टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरली. तिने इंग्लंडच्या हॅरिट डार्टसाेबत स्पर्धेत महिला दुहेरीचा किताब पटकावला. यासह अाशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेती प्रार्थना २५००० डाॅलरच्या बक्षिसाची मानकरी ठरली. या साेनेरी यशासह तिने इंडाेनेशिया येथे झालेल्या या स्पर्धेत अापला दबदबा निर्माण केला.

फेड चषक प्लेअर प्रार्थना अाणि इंग्लंडच्या हॅरिटने महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात राेमहर्षक विजयाची नाेंद केली. या जाेडीने थायलंडच्या निचा लेर्टपिताकिनचाई अाणि नुदिंडा लुअागनामवर ६-४, ४-६, १८-१६ अशा फरकाने मात केली. यासाठी विजेत्या जाेडीला तिसऱ्या सेटपर्यंत शर्थीची झंुज द्यावी लागली. मात्र, सरस खेळी करत या जाेडीने शानदार विजय साकारला. पहिल्या सेटमध्ये बाजी मारून प्रार्थाना-हॅरिटने दमदार सुरुवात केली. मात्र, या जाेडीला दुसऱ्या सेटमध्ये गचाळ खेळीचा माेठा फटका बसला. प्रतिस्पर्धी जाेडीने ६-४ ने दुसरा सेट जिंकून सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रार्थना अाणि हॅरिटने दमदार पुनरागमन करताना रंगतदार तिसरा अाणि निर्णायक सेट १८-१६ ने जिंकून सामना अापल्या नावे केला. या वेळी या जाेडीने सरस खेळी करून जेतेपदावर नाव काेरले.

‘विजेतेपद जिंकण्यासाठी केलेल्या मेहनतीचे मला फळ मिळाले. यासाठी मी सहा महिन्यांपासून कसून सराव करत हाेती. या वेळी सहकारी हॅरिटनेही मला चांगली साथ दिली,’अशी प्रतिक्रिया प्रार्थनाने दिली.

२५,००० डाॅलरचा पहिला किताब
अाशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या प्रार्थनाने अापल्या टेनिस करिअरमध्ये पहिल्यांदा अायटीएफच्या २५,००० डाॅलरच्या स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. तिने गत मार्चमध्ये इजिप्तमध्ये अाणि एप्रिलमध्ये डेहराडून येथील १०,००० डाॅलरचे बक्षीस असलेल्या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले अाहे.
बातम्या आणखी आहेत...