आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिओ अाॅलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचा टेनिसपटू प्रार्थनाला ठोंबरेला विश्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - खेळाची पंढरी अाॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा महाराष्ट्राची टेनिसपटू प्रार्थना ठाेंबरेचा दावा मजबूत मानल्या जात अाहे. गत सत्रातील मेहनतीचे या दाव्याला पाठबळ मिळालेले अाहे. तिने अाशियाई स्पर्धेत कांस्य जिंकले हाेते. यातूनच अाॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या स्वप्नपूर्तीची तिला संधी अाहे.

या स्पर्धेत तिची महिला दुहेरीत सानिया मिर्झा साेबत खेळण्याची शक्यता अाहे. साेलापूरची युवा खेळाडू अाैरंगाबाद येथील सुरू असलेल्या महिलांच्या अायटीएफ टेनिस स्पर्धेत नशीब अाजमावत अाहे.

सिद्ध करण्यावर भर
अांतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, यासाठी मी स्वत:ला सिद्ध करण्यावर अधिक भर देत अाहे. याच सक्षमतेच्या बळावर मला दर्जेदार कामगिरी करता येईल. यासाठी मी कसून सरावातून गुणवत्ता अाणि कामगिरीचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करत अाहे, असेही प्रार्थना म्हणाली.

सानिया मिर्झाचा काैल!
अाॅलिम्पिकमधील महिला दुहेरीत सानियाला अापला जाेडीदार निवडण्याची संधी अाहे. तिने दिलेल्या पसंतीच्या खेळाडूलाच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. यात सध्या प्रार्थनाचे अव्वल अाहे. तिने अाशियाई स्पर्धेत सानियासाेबत कांस्यपदक जिंकले हाेते. त्यामुळे सानियाचा निवडीचा काैल तिला मिळू शकताे.


बँकाॅकमध्ये रंगीत तालीम
अाॅलिम्पिकची रंगीत तालीम ही बँकाॅक येथील फेड चषकात रंगणार अाहे. येत्या ७ फेब्रुवारीपासून फेड चषकाला सुरुवात हाेईल. सानियाच्या नेतृत्वात भारताचा संघ स्पर्धेत सहभागी हाेत अाहे. या संघात प्रार्थनाचाही समावेश अाहे. त्यामुळे तिला चषकात दुहेरीत सानियासाेबत खेळण्याची संधी अाहे. तिला अव्वल कामगिरीतून अालिम्पिकमध्येही सानियासाेबत खेळण्याचा दावा मजबूत करण्याची संधी अाहे.

दर्जेदार सहकारी खेळाडूची वानवा
सानियासाेबत महिला दुहेरीत खेळण्यासाठीच्या दर्जेदार खेळाडूची वानवा दिसून येते. कारण सानियाच्या कामगिरीच्या तुलनेत खेळी करणाऱ्या खेळाडूंचा अभाव अाहे. मात्र, गत सत्रात निर्माण झालेली ही उणीव साेलापूरच्या प्रार्थनाने भरून काढली.
बातम्या आणखी आहेत...