आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Premier Badminton League Opening Ceremony: Jacqueline Fernandez Perform Here

PBL ओपनिंग सेरेमनीत जॅकलीनचा \'हँगओव्हर\', केले जबरदस्त परफॉर्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परफॉर्म करताना अॅक्ट्रेस जॅकलीन फर्नांडीस. - Divya Marathi
परफॉर्म करताना अॅक्ट्रेस जॅकलीन फर्नांडीस.
मुंबई- प्रीमियर बॅडमिंटन लीगला (पीबीएल) शनिवारी सुरुवात झाली. लीगच्या ओपनिंग सेरेमनीसाठी बॅडमिंटन जगतातून अनेक स्टार खेळाडूंनी हजेरी लावली. यावेळी जॅकलीन फर्नांडीसने 'चिट्टियां कलाईयां..', 'हँगओव्हर..' आणि 'सूरज डूबा है..' या गाण्यांवर जबरदस्त परफॉर्म केले. पीबीएलचे हे दुसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी या लीगचे नाव इंडियन बॅडमिंटन लीग (आईबीएल) असे होते. मात्र या वर्षी हे नाव बदलून पीबीएल करण्यात आले आहे.

ओपनिंग सेरेमनीत कुणी-कुणी केले परफॉर्म...
या ओपनिंग सेरेमनीत म्यूझिशियन सलीम-सुलेमानच्या जोडीने 'चक दे इंडिया..', 'बॅन्ड बाजा बारात..' आणि पीबीएलचे ऑफिशियल सॉन्ग 'हल्ला मचा दे..' यावरही यावेळी परफॉर्म करण्यात आले. या कार्यक्रमास ब्रॅन्ड अॅबेसेडर अक्षय कुमार येऊ शकला नाही. यावेळी सायना नेहवाल आणि ज्वाला गुट्टा सह अनेक स्टार शटलर उपस्थित होते.
सामन्यांचा निकाल
- गुरुसाई दत्त मुंबई रॉकेट्सने एस.प्रणीतला (अवध वॉरियर्स) 14-15, 15-10, 15-8 फरकाने हरवले. व्लादिमीर इव्हानोवने (मुंबई रॉकेट्स) के यून/हेंद्रा गुनवानला (अवध वॉरियर्स) 15-11, 15-11 फरकाने हरवले.
- रुत्विका गड्डेने (मुंबई रॉकेट्स) रुशालीला (अवध वॉरियर्स) 15-13, 15-10 फरकाने हरवले.
- नोनसेकने (अवध वॉरियर्स) एचएस प्रणयला (मुंबई रॉकेट्स) 15-12, 14-15, 15-14 फरकाने हरवले.
- बोदिन इसारा-क्रिस्टिना पेडर्सन यांनी (अवध वॉरियर्स) कॅमिला-व्लादिमीरला (मुंबई) 15-9, 14-15, 15-14 अशा फरकाने हरवले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PBL ओपनिंग सेरेमनीचे काही खास फोटोज...