आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगाल वाॅरियर्सकडून दबंग दिल्ली टीमचे पानिपत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली- बंगाल वाॅरियर्सने शनिवारी दुसऱ्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगमध्ये शानदार विजयाची नाेंद केली. बंगालने घरच्या मैदानावर यजमान दिल्लीचे पानिपत केले. बंगालच्या वाॅरियर्सने २०-१७ अशा फरकाने रंगतदार सामना जिंकला. यासह बंगालच्या टीमने गुणतालिकेत सातवे स्थान गाठले. या टीमचे दोन विजयासह एकूण १६ गुण झाले अाहेत. दिल्लीला लीगमध्ये सहाव्या पराभवाचा सामना करावा लागला.
पाटणाचा विजयी चाैकार : पाटणा पायरेट्सने लीगमध्ये विजयी चाैकार मारला. या टीमने सामन्यात बंगळुरू बुल्सचा पराभव केला. पाटणाने ३०-२८ ने सामना जिंकला.
जयपूरसमाेर अाज दिल्ली

यू मुंबाचा विजयरथ राेखल्याने अात्मविश्वास द्विगुणित झालेल्या गतविजेत्या जपयूर पिंक पँथर्स संघाला साेमवारी दबंग दिल्लीच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. पराभवाच्या गर्तेत सापडलेला दिल्लीचा संघ विजयी ट्रॅकवर येण्यासाठी उत्सुक अाहे. या टीमला गत सामन्यात बंगालने पराभूत केले.