आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्मार्ट सिटी’चे उद््घाटन; पुण्याची कबड्डी मुंबईत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रो कबड्डीच्या चौथ्या हंगामाची पुण्यात धूमधडाक्यात सुरुवात येत्या २५ जून रोजी होणार होती. मात्र, ‘स्मार्ट सिटी’ समारंभाच्या उद््घाटन सोहळ्याची माशी नेमकी बालेवाडी येथे शिंकली आणि प्रो कबड्डीला आपला गाशा गुंडाळून मुंबईत यावे लागले. आमचा कार्यक्रम २५ ते २८ जून असा ४ दिवसांचा होता आणि नेमके त्याच वेळी बालेवाडी येथे ‘व्हीआयपी’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती याबाबत प्रो कबड्डीच्या संयोजन व्यवस्थेचे प्रमुख मशाल स्पोर्ट््सचे चारू शर्मा यांनी दिली.

क्रीडा उपसंचालक माणिकराव ठोसरे म्हणाले, ‘स्मार्ट सिटी’चा उद््घाटन सोहळा २५ जून रोजी ४ ते ५.३० या वेळेत होणार आहे. कबड्डीचा उद््घाटन सोहळा २ हजार प्रेक्षक क्षमतेच्या बॉक्सिंग हॉलमध्ये होणार होता. आम्ही ‘प्रो कबड्डीला’ बालेवाडी संकुलातच ६ हजार प्रेक्षक क्षमतेच्या जिम्नॅस्टिक्स हॉलमध्ये तो कार्यक्रम घ्यावा, असे सुचवले होते. त्यावर आम्ही नंतर कळवतो, असे सांगून त्यांनी काहीच कळवले नाही.’

यावर चारू शर्मा म्हणाले, "टेलिव्हिजन कव्हरेज आणि स्पॉन्सर्स यांचा प्रश्न निर्माण झाला होता. आयोजकांना त्यामुळे हे दोन महत्त्वाचे घटक डावलून चालणार नव्हते. त्यामुळे सहजसाध्य असणाऱ्या मुंबईच्या ठिकाणाची आयत्यावेळी निवड करण्यात आली.'
बालेवाडीतच त्यापेक्षा अधिक मोठी जागा उपलब्ध करून दिल्यानंतरही पुणेरी पलटणने क्रीडा खात्याची ‘ऑफर’ का स्वीकारली नाही, हे एक कोडेच आहे. प्रो कबड्डी उद््घाटन सोहळा आयोजित करण्याची क्षमता नसल्यामुळे ‘स्मार्ट सिटी’ उद््घाटन सोहळ्याचे निमित्त करून उद््घाटन सोहळा मुंबईत हलवण्यात आल्याची चर्चा आहे.
बातम्या आणखी आहेत...