आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pro Kabaddi League: Delhi Defeated, Bangalur Registered Fourth Victory

प्राे कबड्डी लीग: दिल्ली पराभूत; बंगळुरूचा विजयी चाैकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - जबरदस्त फाॅर्मात असलेल्या बंगळुरू बुल्स संघाने साेमवारी दुसऱ्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगमध्ये विजयाचा चाैकार मारला. मनजितच्या नेतृत्वाखाली बंगळुरू बुल्सने लीगमधील अापल्या पाचव्या सामन्यात दबंग दिल्लीला पराभवाचा जबर धक्का दिला. या टीमने ३३-१८ ने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह बंगळुरू संघाने चाैथा विजय अापल्या नावे केला. तसेच या टीमने गुणतालिकेत २० गुणांसह तिसऱ्या स्थानावर धडक मारली.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर बंगळुरू बुल्सचा कर्णधार मनजितने शानदार खेळी केली. त्याने सर्वाधिक गुणांची कमाई करून संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. तसेच साेमवीर शेखरने (६) उत्कृष्ट चढाई करून संघाला विजय मिळवून दिला. अजय ठाकूर (४), धर्मराज (४ ) जाेगिंदर नारवालनेही (३) संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
गडी बाद करण्याच्या प्रयत्नात खेळाडूंमध्ये रंगलेली चुरस.

जयपूरचा चाैथा पराभव
सिने अभिनेता अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्स संघाला यंदाच्या प्राे कबड्डी लीगमध्ये सलग चाैथ्या पराभवाचा सामना करावा लागला. यजमान जयपूर टीमला तेलुगू टायटन्सने धूळ चारली. फाॅर्मात असलेल्या तेलुुगूने ३३-२२ अशा फरकाने विजय मिळवला. तसेच एकूण २१ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर धडक मारली. राहुल चाैधरी (११), दीपक निवास (६०, सुकेश हेगडे (७) प्रसाद (३) यांच्या चुरशीच्या खेळीतून तेलुगू टायटन्सने विजय साकारला.