आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कबड्डी लीगमध्‍ये चुरशीच्‍या लढतीत दिल्‍ली दबंगने मारली बाजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रो कबड्डी लीगमध्‍ये दिल्ली दबंग आणि पुणेरी फलटण संघात चुरशीची लढत झाली. पूर्वार्धापर्यंत पुणेरी फलटन पीछाडीवर होते. नंतर पुणेरी पलटण संघाणे अधिक गडी टीपण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु त्‍यांचा हा प्रयत्‍न निष्‍फळ ठरला या चुरशीच्‍या लढतीमध्‍ये दिल्‍ली दबंग सोबत 37-38 अशा फरकाने पराभव पत्‍कारावा लागला या सामण्‍यात दिल्‍ली दबंग संघाणे सुरवातीच्‍या काही मिनिटाने जोरदार मुसंडी मारत आघाडी मिळवली होती.
दिल्‍ली दबंग आणि पुणेरी फलटन यांच्‍यातील सामन्‍यात खुप कमी फरकाची चढ उतार पहावयास मिळाली सामन्‍याच्‍या दोन मिनीटाला दोन्‍ही संघ 37-37 अशा बरोबरीवर आले होते. परंतु दिल्‍लीच्‍या रविंदरणे शेवटच्‍या इनट्रीत एक गडी बाद करूण चुाशीच्‍या लढतीत दिल्‍ली संघाला विजय मिळवून दिला.
दिल्लीकडून रोहितकुमार चौधरीने तीन बोनस गुणांसह ११ गुण नोंदवले तर काशिलिंगने दोन बोनस गुणांसह १२ गुणांची कमाई केली. पुण्याकडून वझीर सिंगने दोन बोनस गुणांसह १३ गुण नोंदवले तर प्रवीण नेवाळेने आठ गुण कमावले.