आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राे कबड्डी लीग: जयपूर विजयी ट्रॅकवर, बंगळुरूचा दुसरा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्सला अखेर दुस-या सत्राच्या प्राे कबड्डी लीगमध्ये विजयाचे खाते उघडण्यात यश आले. सलगच्या पराभवाची मालिका खंडित करून जयपूर संघाने मंगळवारी सनसनाटी विजयाची नाेंद केली. यजमान जयपूर संघाने अापल्या घरच्या मैदानावर फाॅर्मात असलेल्या बंगळुरू बुल्सला राेखले.

जयपूरच्या संघाने रंगतदार सामना ३६-२३ अशा फरकाने जिंकला. चार पराभवांनंतर जयपूरचा हा लीगमधील पहिला विजय ठरला. या धडाकेबाज विजयासह जयपूर संघाने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर धडक मारली. या टीमचे अाता ८ गुण झाले अाहेत.
करा वा मरा अशा परिस्थितीला सामाेरे जाणा-या यजमान टीमने सामन्यात विजय मिळवला. यासह टीमने लीगमध्ये दमदार पुनरागमन केले. दुसरीकडे बंगळुरू बुल्सचा पाचव्या विजयाचा प्रयत्न उधळून लावला. बंगळुरूचा लीगमधील हा दुसरा पराभव ठरला.

जयपूरसमाेर अाज दबंग दिल्ली : गत विजेत्या जयपूर संघाला बुधवारी अापल्या घरच्या मैदानावर दबंग दिल्लीच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागले. दिल्ली तिस-या विजयासाठी प्रयत्नशील अाहे.

जसवीर, कुलदीपमुळे विजय
जयपूर टीमच्या विजयात जसवीरसिंग अाणि कुलदीपसिंग यांनी माेलाची भूमिका बजावली. जसवीरने सर्वाधिक ८ गुणांची कमाई करून विजयात माेलाचे याेगदान दिले. तसेच कुलदीपने ७, राेहित राणाने ५ व रणसिंगने ४ गुणांसह संघाला विजय मिळवून दिला.
पुणे-बंगाल अाज झुंजणार जयपूरच्या मैदानावर बुधवारी पुणेरी पलटण अाणि बंगाल वाॅरियर्स यांच्यात सामना रंगणार अाहे.
छायाचित्र: बंगळुरू बुल्सच्या गड्याची पकड करताना जयपूर पिंक पँथर्सचे खेळाडू.