आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणेरी पलटणवर ३९-३४ ने केली मात; मुंबाने लीगमध्ये मिळवला १२ वा विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - गत उपविजेत्या यू मुंबा टीमने दुसऱ्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगमध्ये साेमवारी १२ व्या विजयाची नाेंद केली. या टीमने रंगतदार लढतीत यजमान पुणेरी पलटणचा घरच्या मैदानावर दारुण पराभव केला. मुंबाने ३९-३४ अशा फरकाने सामना जिंकला. यासह मुंबाने लीगमध्ये अापल्या १२ व्या विजयाच्या बळावर गुणतािलकेतील अव्वल स्थान मजबूत केले. अाता मुंबाचे गुणतालिकेत सर्वाधिक ६० गुण झाले अाहेत.

दुसरीकडे यजमान पुणेरी पलटण टीमला या वेळी नवव्या पराभवाचा सामना करावा लागला.
प्रदीपकुमारचा दबदबा : सामन्यात मुंबा टीमच्या प्रदीपकुमारने चुरशीची खेळी करून मैदानावर अापला दबदबा निर्माण केला. त्यामुळेच यजमान टीमला प्रदीपकुमारला राेखताना अपयशाला सामाेरे जावे लागले. याचाच फायदा घेत त्याने सर्वाधिक १० गुणांची कमाई करून संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यापाठाेपाठ पवनकुमार (७), फजल (७) अाणि भूपिंदरसिंगने (५) शानदार खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. यजमान पुणेरी पलटणकडून अमित राठीने अापल्या घरच्या मैदानावर सर्वाधिक सहा गुण संपादन केले. तसेच रविकुमार (४), मनाेज (४) सपशेल अपयशी ठरले.
तेलुगूसमाेर अाज यू मुंबा
तेलुगू टायटन्सला जरबदस्त फाॅर्मात असलेल्या यू मुंबा टीमच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. मंगळवारी पुण्याच्या मैदानावर हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. दुसरीकडे पुणेरी पलटण अाणि पाटणा पायटरेट्स हे दाेन्ही संघ झुंजणार अाहेत. पुणेरी पलटणला अापल्या घरच्या मैदानावर शानदार विजयाची आशा अाहे.