आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pro Kabaddi League: Patana Victory, Mumba Hit Six

प्राे कबड्डी लीग: पाटणा विजयी; मुंबाचा षटकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - राकेश कुमारच्या नेतृत्वाखाली पाटणा पायरेट्स संघाने पराभवाची मालिका खंडित करत रविवारी दुसऱ्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगमध्ये विजयाचे खाते उघडले. या संघाने लीगमधील अापल्या तिसऱ्या सामन्यात गत चॅम्पियन जयपूर पिंक पँथर्स संघाविरुद्ध सनसनाटी विजयाची नाेंद केली. पाटणा संघाने २९-२३ अशा फरकाने सामना जिंकला. लीगमधील पाटणा संघाचा हा पहिला विजय ठरला. या विजयासह पाटणाच्या टीमने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर धडक मारली.

राकेश कुमार (८) अाणि संदीप नारवाल (७) यांनी केलेल्या उल्लेखनीय खेळीच्या बळावर पाटणा पायरेट्स संघाने शानदार विजय मिळवला. या वेळी सुनील कुमार (२) अाणि अमन कुमार (१) यांनीही संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे टीमला सामना जिंकता अाला.

दमदार सुरुवात करताना पाटणा संघाने सलग गुणांची कमाई केली. त्यामुळे या टीमला सामन्यावरची अापली पकड अधिक मजबूत करता अाली. संदीप अाणि कर्णधार राकेशने उत्कृष्ट चढाई करून संघाला गुण मिळवून दिले. त्यामुळे या टीमला मध्यंतरापूर्वी सामन्यात माेठी अाघाडी घेता अाली. दुसऱ्या हाफमध्येही अापला दबदबा कायम ठेवताना या टीमने अाघाडीला मजबूत केले. दरम्यान, जयपूरने अापल्या घरच्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी जाेरदार प्रयत्न केले. मात्र, सिनेअभिनेता अभिषेक बच्चनच्या जयपूर संघाला समाधानकारक खेळी करता अाली नाही.

जयपूरचा सलग तिसरा पराभव : गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्स संघाला रविवारी पराभवाचा सामना करावा लागला. गतविजेत्या टीमचा लीगमधील हा सलग तिसरा पराभव ठरला. तसेच अापल्या घरच्या मैदानावरील पहिला पराभव अाहे. या टीमला अद्याप पराभवाची मालिका खंडित करता अाली नाही. संघाचा कर्णधार नवनीत गाैतम सामन्यात सपशेल अपयशी ठरला. तसेच राेहित राणालाही समाधानकारक खेळी करता अाली नाही. या वेळी जसवीर सिंग (७) अाणि राजेश नारवाल (६) यांनी एकाकी झंुज दिली. मात्र, त्यांना पराभवाची मालिका खंडित करता अाली नाही.

यू मुंबाचा सलग सहावा विजय; तेलुगूवर २७-२६ ने मात
अनुप कुमारच्या नेतृत्वात शेवटच्या पाच मिनिटांत सामन्याला कलाटणी देऊन रविवारी यू मुंबा संघाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यू मुंबा टीमने तेलुगू टायटन्सला २७-२६ अशा फरकाने पराभूत केले. गत उपविजेत्या मुंबा संघाचा लीगमधील हा सलग सहावा विजय ठरला. या विजयासह मुंबा टीमने गुणतालिकेतील अापले अव्वलस्थान कायम ठेवले. अनुप कुमार (१०) अाणि रिशांक देवडिगा (७) यांनी चुरशीची खेळी करून संघासाठी विजयश्री खेचून अाणली.

जखमी नीलेशची प्रकृती स्थिर
दबंग दिल्लीिवरुद्ध शनिवारी रात्री गंभीर जखमी झालेल्या नीलेश शिंदेची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली. नीलेश हा लीगमध्ये सौरव गांगुलीच्या बंगाल वॉरियर्स टीमचे प्रतिनिधित्व करत आहे. गत सामन्यात दिल्लीविरुद्ध खेळताना नीलेशला गंभीर दुखापत झाली होती. तातडीने उपचार केल्याने त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे कळते.

जयपूर पिंक-तेलुगू अाज झुंजणार
सिनेअभिनेता अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सला अापल्या घरच्या मैदानावर साेमवारी तेलुगू टायटन्स संघाच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. जयपूरच्या मैदानावर रात्री ९ वाजता सामना हाेणार अाहे. विजय मिळवण्याच्या इराद्याने जयपूर घरच्या मैदानावर उतरणार अाहे.

बंगळुरूसमाेर अाज दबंग दिल्ली
दुसऱ्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगमध्ये मनजितसिंगच्या नेतृत्वाखाली विजयी चाैकार मारण्यासाठी बंगळुरू बुल्स संघ सज्ज झाला अाहे. लीगमध्ये साेमवारी जयपूरच्या मानसिंग स्टेडियमवर बंगळुरू बुल्स अाणि दबंग दिल्ली यांच्यात सामना रंगणार अाहे. या सामन्यात बाजी मारून लीगमध्ये तिसऱ्या विजयाची नाेंद करण्याचा दिल्ली टीमचा प्रयत्न असेल.
छायाचित्र: गत विजेत्या जयपूर पिंक पँथर्स टीमच्या खेळाडूची पकड करताना पाटणा पायरेट्स संघाचे खेळाडू.