आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राे कबड्डी लीग : पुणेरी पलटण विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - प्रो कबड्डी स्पर्धेत पुणेरी पलटणने शानदार खेळाचे प्रदर्शन करत बंगाल वॉरियर्सवर ३३-२९ गुणांनी विजय मिळवला. पलटणच्या प्रवीण निवालेने उत्कृष्ट कामगिरी करत सामना गाजवला. त्याला सामन्यातील सर्वोत्तम चढाईपटूचा पुरस्कार देण्यात आला. बंगाल वॉरियर्स कर्णधार दिनेशकुमारच्या खराब खेळीचा फटका संघाला बसला. निर्णायक क्षणी सुपर चढाई करत प्रवीण निवालेने गुण घेत पुणेरी पलटणला वर्चस्व मिळवून दिले. त्यानंतर पिछाडीवर पडलेला बंगाल वॉरियर्स कामगिरीत सुधारणा करू शकला नाही.

बंगाल वॉरियर्सने मध्यंतराला १७-१० अशी असणारी आघाडी अखेरच्या मिनिटाला ३२-२९ अशी कमी केली होती. पण संघाला विजय मिळवून देण्यात संघाचे शिलेदार अपयशी ठरले. पुणेरी पलटणने अवघ्या गुणांनी विजय संपादन केला. बंगालचा चढाईपटू यांग कुन ली याच्या चढाया पाहण्यासारख्या होत्या.
छायाचित्र: पुणेरी पलटणच्या पकडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना बंगाल वॉरियर्सचा रेडर.