आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कबड्डी लीगचा दम अाजपासून मुंबईत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत येऊन यजमानपद भूषवणारे ‘पुणेरी पलटण’ आणि तेलुगू टायटन्स यांच्यातील लढतीने शनिवारपासून प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या पर्वाला सुरुवात होईल. पुण्याच्या बालेवाडीतून मुंबईच्या सरदार पटेल स्टेडियमवर आपल्या साखळीचे सामने आयोजित करणाऱ्या पुणे संघाला हैदराबादशी रात्री ८ वाजता लढावे लागेल.

माजी विजेते यू मुम्बा आणि पहिल्या पर्वाचे विजेते जयपूर पिंक पँथर्स यांच्यातील लढत रात्री ९ वाजता होईल. स्टार स्पोर्ट््सच्या क्रीडा वाहिनीवरून थेट प्रक्षेपित होणाऱ्या या प्रो कबड्डी लीगबाबतची पहिल्या पर्वाच्या वेळची उत्सुकता मात्र या वेळी दिसून येत नाही. टेलिव्हिजन चॅनलसाठीच आयोजित करण्यात येत असलेल्या या कबड्डी स्पर्धेत भारतासह अन्य देशांतील कबड्डीपटू सहभागी होत असल्यामुळे सर्वसामान्य क्रीडारसिकांचा उत्साह दिसून आला होता.

काेट्यवधींची बक्षिसे
यंदा चाैथ्या सत्रातील कबड्डी लीगमधील विजेत्या संघावर एक काेटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव केला जाईल. याशिवाय उपविजेता संघ ५० लाखांच्या बक्षिसाचा मानकरी ठरेल. तिसऱ्या स्थानावरच्या संघाला ३० लाख अाणि चाैथ्या स्थानावरच्या संघाला २० लाखांचे बक्षीस मिळेल.