आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटणा पायरेट्ससमाेर अाज मुंबाचे अाव्हान, १३ व्या विजयासह अंतिम फेरी गाठण्याचा मानस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सलगच्या विजयाची माेहीम अबाधित ठेवून यू मुंबा संघ शुक्रवारी दुसऱ्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगची फायनल गाठण्यासाठी सज्ज झाला अाहे. गत उपविजेत्या मुंबाचा लीगमधील दुसरा उपांत्य सामना पाटणा पायरेट्सशी हाेणार अाहे. अंतिम फेरीतील प्रवेशाच्या इराद्याने यजमान यू मुंबा टीमने अापल्या घरच्या मैदानावर उतरणार अाहे. याशिवाय पाटणा टीमला बलाढ्य मुंबाच्या तगड्या अाव्हानाचा सामना करावा लागणार अाहे. मुंबाने सर्वाधिक १२ विजयासह लीगमध्ये अापला दबदबा निर्माण केला अाहे. त्यामुळे यजमान टीमला घरच्या मैदानावर राेखण्याचे माेठे अाव्हान पाटणा पायरेट्सला पेलावे लागेल. अाता धडाकेबाज विजय मिळवून फायनल गाठण्याच्या इराद्याने पाटणा टीम राकेश कुमारच्या नेतृत्वात मैदानावर उतरणार अाहे.
अनुपकडून ‘बाेनस’ची अाशा
लीगमधील बाेनस फेम अनुपकुमारच्या नेतृत्वात गत उपविजेता यू मुंबा संघ मैदानावर उतरणार अाहे. टीमला कर्णधार अनुपकुमारकडून बाेनस कामगिरीची अाशा अाहे. उत्कृष्ट चढाई करून क्षणार्धात बाेनस करण्यात अनुप फार तरबेज अाहे. याशिवाय रिशांक देवडिगावरही संघाच्या विजयाची मदार असेल. त्यामुळे मुंबाला अापल्या घरच्या मैदानावर दबदबा राखता येणार अाहे.
तेलुगू टायटन्स-बंगळुरू भिडणार
पहिल्या उपांत्य लढतीत तेलुगू टायट्न्स व बंगळुरू बुल्स भिडणार अाहेत. बंगळुरूने नऊ विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. याशिवाय हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर अाहे. मंजितच्या नेतृत्वात विजयासह अंतिम फेरीत प्रवेशाचा बंगळुरू टीमचा प्रयत्न असेल. दुसरीकडे सात विजयाच्या बळावर पाटणा टीमने अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित केला. राजगुरूच्या नेतृत्वात उपांत्य लढत जिंकण्याचे तेलुुगू टायट्न्सचे मनसुबे अाहेत.

अाजच्या उपांत्य लढती
तेलुगू टायटन्स विरुद्ध बंगळुरू बुल्स
स्थळ : मुंबई, वेळ : रात्री : ८ वाजता
यू मुंबा विरुद्ध पाटणा पायरेट्स
स्थळ : मुंबई, वेळ : रात्री ९ वाजता