आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pro Kabaddi League: Telugu Titans Go Ahead, Patana Pirates Defeated

प्रो कबड्डी लीग: तेलुगू टायटन्सची आगेकूच, पाटणा पायरेट्स पराभूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरुवातीपासून आक्रमक खेळ, मैदानावर दृष्ट लागण्यासारखी चपळता, अचूक पकडीच्या बळावर तेलुगू टायटन्सने प्रो कबड्डी लीगमध्ये आणखी एक विजय मिळवत आगेकूच केली. - Divya Marathi
सुरुवातीपासून आक्रमक खेळ, मैदानावर दृष्ट लागण्यासारखी चपळता, अचूक पकडीच्या बळावर तेलुगू टायटन्सने प्रो कबड्डी लीगमध्ये आणखी एक विजय मिळवत आगेकूच केली.
पाटणा - सुरुवातीपासून आक्रमक खेळ, मैदानावर दृष्ट लागण्यासारखी चपळता, अचूक पकडीच्या बळावर तेलुगू टायटन्सने प्रो कबड्डी लीगमध्ये आणखी एक विजय मिळवत आगेकूच केली. गुरुवारी झालेल्या रोमांचक लढतीत तेलुगू टायटन्सने पाटणा पायरेट्सला ३४-२२ अशा गुणांच्या फरकाने एकतर्फी लढतीत हरवले. घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांसमोर पाटण्याची टीम जोरदार प्रदर्शन करेल, असे वाटत होते. मात्र, टायटन्सच्या खेळाडूंनी यजमान संघाला एकही संधी दिली नाही.

सुरुवातीला पाहुण्या तेलुगू टायटन्सच्या दीपक हुड्डाला वारंवार जेरबंद करून पाटणा पायरेट्सने सामन्यात घरच्या मैदानावर जबरदस्त चुरस निर्माण केली होती. सलग तीनदा त्याची पकड करून पाटणा पायरेट्स मध्यंतराला १२-१३ अशा अवघ्या एका गुणाने मागे होता. हा अटीतटीचा सामना रंगात होता, जोरदार खेळ होणार असेच सर्वांना वाटत होते, पण सुकेश हेगडेने २७ व्या मिनिटाला एकाच चढाईत तीन गडी बाद करून मिळवलेली आघाडीच निर्णायक ठरली. या चढाईमुळे कंबरडे मोडलेला पाटणा पायरेट्स संघ पुन्हा उभा राहू शकला नाही आणि त्यांनी तेथेच घरच्या मैदानावर रंगतदार सामना गमावला. पुढे फक्त पाटणा पायरेट्स संघाचे अव्वल चढाईपटू आणि संरक्षक बाद होते गेले आणि तेलुगू टायटन्सने गुणांचा सपाटा लावत ३४-२२ अशी आघाडी घेत प्रो कबड्डी लीगच्या दुस-या मोसमात पाचव्या विजयाची नोंद केली आणि गुणतालिकेतील आपले दुसरे स्थान कायम राखले. दुसरीकडे पाटणा पाटरेट्स संघ तिस-या पराभवाने गुणतालिकेत तळाला पोहोचला.

पाटणाचा घरच्या मैदानावर पराभव
पाटणाच्या पाटलीपुत्र क्रीडा संकुलावर पाटणा पायरेट्सला आपल्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार राकेश कुमारचे अपयश संघाच्या निराशाजनक कामगिरीला कारणीभूत ठरले. राकेश कुमार तीनच गुण मिळवून देऊ शकला. येथेच त्यांच्या संघाचा पराभव जवळजवळ निश्चित झाला. राकेश अपयशी ठरत असताना रवी दलाल आणि संदीप नरवालकडून अपेक्षा होती, पण तेसुद्धा काहीच करू शकले नाहीत.