आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राे कबड्डी लीग: तेलुगू टायटन्सकडून दबंग दिल्ली पराभूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राहुलच्या नेतृत्वाखाली तेलुगू टायटन्सने रविवारी दुसऱ्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगमध्ये दमदार सुरुवात केली. टायटन्सने अापल्या पहिल्या सामन्यात दबंग दिल्लीचा ३६-२७ अशा फरकाने पराभव केला. यासह टाययन्सने स्पर्धेत विजयाचे खाते उघडले. अाता टायटन्सचा दुसरा सामना साेमवारी पुणेरी पलटणशी हाेणार अाहे.

मेराज शेख टायटन्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने संघाच्या विजयात सर्वाधिक ११ गुणांचे याेगदान दिले. याशिवाय कर्णधार राहुलने (५), दीपक हुडा (७) अाणि संदीपने (४) संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली अाहे.

अाज दुसऱ्या विजयाची संधी!
सलामीच्या विजयाने अात्मविश्वास दुणावलेल्या टायटन्सला दुसरा सामना जिंकण्याची संधी अाहे. पुणेरी पलटण व तेलुगू टायटन्स यांच्यात साेमवारी सामना रंगणार अाहे. टायटन्सकडेही राहुल चौधरी, रणजित, सुकेशसारखे तगडे खेळाडू अाहेत.
बातम्या आणखी आहेत...