आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राे कबड्डी लीग: यूपी याेद्धाचा तिसरा विजय; टायटन्स टीमचा सहावा पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- यूपी याेद्धा टीमने शनिवारी प्राे कबड्डी लीगच्या सामन्यात शानदार विजय संपादन केला. या संघाने रंगतदार लढतीमध्ये तेलुगु टायटन्सचा पराभव केला. याेद्धा टीमने ३९-३२ अशा फरकाने सामना जिंकला. यासह याेद्धांनी लीगमध्ये तिसऱ्या विजयाची नाेंद केली. दुसरीकडे विजयी ट्रॅकवर येण्याचा तेलुगु टायटन्सचा प्रयत्न अपयशी ठरला. त्यांना लीगमध्ये सहाव्या पराभवाचा सामना करावा लागला. नितीन ताेमरच्या (१०) शानदार चढाईच्या बळावर याेद्धांनी विजयश्री खेचून अाणली. रिशांक देवडिगा (६) यानेही संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. या विजयाच्या बळावर अाता यूपी याेद्धा टीमच्या नावे १५ गुण झाले अाहेत. यासह या संघाने गुणतालिकेत तिसरे स्थान गाठले.   

गुजरातचा तिसरा विजय : गुजरात टीमने चमकदार खेळीच्या बळावर शनिवारी राेमहर्षक विजयाची नाेंद केली. या संघाने सामन्यात दबंग दिल्लीला धूळ चारली. गुजरातने २९-२५ अशा फरकाने विजयश्री खेचून अाणली. सुकेश (७) अाणि सचिनने (८) सरस खेळी करताना अापल्या गुजरातला माेठा विजय मिळवून दिला. 
बातम्या आणखी आहेत...