आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रो कबड्डी लीग : इराणच्या कबड्डीपटूंवर ४२ लाखांची बोली, दुसरे सत्र लवकरच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पहिल्याच वर्षी टेलिव्हिजन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या प्रो कबड्डीने यंदा दुसऱ्या वर्षीच्या हंगामाआधीच धूमधडाक्यात सुरुवात केली आहे. ८ शहरांच्या या कबड्डी लीगच्या पहिल्याच लिलावात परदेशी कबड्डीपटूंची मोठी मागणी प्रकर्षाने जाणवली. पायाभूत किंमत अवघी दीड लाख असलेल्या इराणच्या हादी ओस्कोरॅकला लिलावात तब्बल १४ पट अधिक किंमत मिळाली.
हादीसाठीची बोली वाढत वाढत २१.१ लाख रुपयांपर्यंत गेली आणि तेलगू टायटन्सने हादीसाठी लावलेली बोली अखेर यशस्वी ठरली. त्याचा सहकारी मेराज शेखला २०.१ लाखांत तेलगू टायटन्सनेच घेतले. तेलगू टायटन्सने इराणच्या मेराज व हादी या जोडगोळीवर चक्क ४१.२ लाख रुपये मोजले आहेत.

मशाल स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘प्रो कबड्डी लीग’ (केपीएल) दुसऱ्या पर्वासाठी एकूण २७ आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूंची बोली लागली होती. त्यापैकी १४ आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूंना विविध शहरांच्या संघांनी करारबद्ध केले. हे २७ आंतरराष्ट्रीय खेळाडू एकूण १३ देशांचे होते. त्यांची निवड त्यांचा अनुभव आणि विद्यमान फॉर्म पाहून करण्यात आली होती.

गतवर्षी पाटणा पायरेट्सने भारताचा आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू राकेशकुमार याच्यासाठी लावलेली १२.८ लाखांची बोली पहिल्या हंगामातील सर्वोच्च बोली होती. मार्शल स्पोर्ट््सचे चारू शर्मा म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बाबतीतला विविध फ्रँचायझींचा प्रतिसाद पाहून आम्ही अवाक् झालो आहोत. प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या हंगामातील यशामुळे आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनकडे दुसऱ्या हंगामासाठीची चौकशी सुरू केली.

कबड्डी प्रचारावर भर!
तेलगू टायटन्सचे श्रीनि श्रीरामनेना यांनी इराणच्या खेळाडूंवर अधिक पैसे मोजल्याचे कारण देताना सांगितले, प्रो कबड्डी स्पर्धेतील सर्वाधिक बोली लागलेले इराणचे हे दोन खेळाडू कबड्डीच्या विकासाच्या सीमा भारताबाहेर पसरवण्यास मदत करणारे आहेत. कबड्डी ऑलिम्पिकमध्ये पोहोचवण्यासाठी अन्य देशांच्या खेळाडूंनी लिलावासाठीची यादी समृद्ध होणे आवश्यक आहे.
बातम्या आणखी आहेत...