आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राे कबड्डी लीग :मुंबाची विजयसप्तमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - अनुपकुमारच्या नेतृत्वाखाली गत उपविजेत्या यु मुंबा संघाने प्राे कबड्डी लीगमधील अापली विजयी माेहीम कायम ठेवली. मुंबा संघाने शनिवारी लीगमध्ये सलग सातव्या विजयाची नाेंद करून अापला दबदबा निर्माण केला. मुंबा संघाने सातव्या सामन्यात दबंग दिल्लीचा २७-२२ अशा फरकाने विजय मिळवला. मुंबाचा हा सलग सातवा विजय ठरला. या विजयाच्या बळावर मुंबाने गुणतालिकेतील अापले अव्वल स्थान अधिक मजबूत केले. अाता मुंबाच्या नावे सात सामन्यांत एकूण ३५ गुण झाले अाहेत.

अाता मंगळवारी हैदराबादच्या मैदानावर गत उपविजेत्या मुंबा टीमला लीगमध्ये सलग अाठव्या विजयाची संधी अाहे. याठिकाणी मुंबाचा सामना पुन्हा एकदा दबंग दिल्लीविरुद्ध हाेणार अाहे. त्यामुळे दिल्लीवरील अापले वर्चस्व अबाधित ठेवत लीगमधील अापल्या विजयी रथाला गती देण्याचा मुंबा टीमचा प्रयत्न असेल.

माेहित चिल्लर (४), सुरेंदर नाडा (३) अाणि अनुप कुमार (३) यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीच्या बळावर मुंबाने सामना जिंकला. याशिवाय जीव कुमार (२) अाणि रिशांक देवडिगाने (२) यांनीही संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे मंुबाला मध्यतरांपासून च अापला दबदबा कायम ठेवता अाला. तसेच मुंबाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट पकडीही केल्या. रविंदरची एकाकी झुंज : दंबग दिल्लीला दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. सलगच्या पराभवाची मालिका खंडीत करून दिल्लीला विजयी ट्रॅकवर अाणण्यासाठी कर्णधार रविंदर पहालने एकाकी झंुज दिली. मात्र, त्याला संघाचा पराभव टाळता अाला नाही. त्याने संघासाठी सर्वाधिक ९ गुणांची कमाई केली. तसेच काशिलींगने ६ गुणांचे याेगदान दिले.

पाटण्याचा तिसरा विजय
यजमान पाटणा पायरेट्स संघाने लीगमध्ये शनिवारी तिसऱ्या विजयाची नाेंद केली. या संघाने अापल्या घरच्या मैदानावर लीगमधील सातव्या सामन्यात पुणेरी पलटणवर मात केली. यजमान टीमने ३२-२८ अशा फरकाने सामना जिंकला. या विजयासह पाटणा संघाने अापल्या घरच्या मैदानावर सलग दुसरा सामना जिंकला. रवी दलाल (७) अाणि कर्णधार संदीप नारवाल (६) यांच्या शानदार खेळीच्या बळावर यजमान संघाने सामना अापल्या नावे केला.

पुणे-जयपूर अाज लढत
पाटणाच्या मैदानावर पुणेरी पलटण अाणि गतविजेता जयपूर पिंक पॅथर्स यांच्यात रविवारी सामना हाेईल. सलगच्या पराभवाची मालिका खंडित करून लीगमध्ये दमदार पुनरागमन करण्याचा जयपूर टीमचा प्रयत्न असेल. दुसरीकडे लीगमध्ये दुसऱ्या विजयाची नाेंद करण्यासाठी पुणेरी पलटण संघ उत्सुक अाहे. तसेच यजमान पाटणा पायरेट्सला घरच्या मैदानावर बंगाल वाॅरियर्सच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल.
छायाचित्र: पाटणाच्या मैदानावर दंबग दिल्ली संघाचे गडी मारून नेण्याच्या प्रयत्नात यु मुंबा टीमचा खेळाडू.
बातम्या आणखी आहेत...