आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राे कबड्डी लीग : बंगळुरू बुल्सचा बंगाल वाॅरियर्सला धक्का, २४-२३ ने राेमहर्षक विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बंगळुरू बुल्स संघाने रविवारी चाैथ्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगमध्ये बंगाल वाॅरियर्सला पराभवाचा जबर धक्का दिला. या टीमने रंगतदार सामन्यात २४-२३ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. राेहित (७ गुण), कर्णधार सुरेंदर नाडा (५) अाणि माेहित छिल्लरच्या (३) अव्वल कामगिरीच्या बळावर बंगळुरू बुल्स संघाने सामना जिंकला.
याशिवाय बंगळुरूने स्पर्धेतील अापल्या किताबाच्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. शेवटपर्यंत एका गुणाची अाघाडी कायम ठेवत बंगळुरूने सामन्यात बाजी मारली. बंगालच्या वाॅरियर्सने विजयासाठी दिलेली झुंज अपयशी ठरली. बंगालने पहिल्या हाफपर्यंत ताेडीस ताेड खेळी करताना सामन्यातील अापला दबदबा कायम ठेवला हाेता. मात्र, त्यानंतर टीमला सुमार खेळीचा माेठा फटका बसला. त्यामुळे त्यांना सामना गमवावा लागला.
बातम्या आणखी आहेत...