आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राे कबड्डी लीग : पुणेरी पलटण टीमचा धडाकेबाज विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गतवर्षी तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पुणेरी पलटणने नव्या मोसमात जबरदस्त सुरुवात करत तेलगू टायटन्सवर २८-२४ गुणांनी मात करून प्रो कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्या हाफमध्ये मागे पडलेल्या पुणेरी पलटणने दुसऱ्या सत्रात उत्कृष्ट कामगिरी करत विजयश्री खेचून आणली. लढतीत महत्त्वाच्या क्षणी रवींदर पहलने तीन गुणांची कमाई करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान िदले. त्याने २५-२४ अशी रोमांचक लढत असताना तीन गुण मिळवले. पहलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पुणेरीचा कर्णधार मनजित चिल्लरने लढतीत शानदार कामगिरी केली. तेलगूकडून संदीप नरवालने एकाकी झुंज दिली. या लढतीदरम्यान युवा क्रिकेट स्टार विराट कोहलीने हजेरी लावली. कबड्डी खेळात फिटनेस लागतो. मी शालेय जीवनात असताना कबड्डी खेळलो आहे. यात आक्रमकता खूप लागते. माझ्यात तेवढी नाही, असे विराट म्हणाला.
बातम्या आणखी आहेत...