आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कबड्डी लीगः बंगळुरू बुल्सविरुद्ध बंगाल वॉरियर्स पराभूत, बंगाल वॉरियर्सचा सातवा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगाल आणि बंगळुरू बुल्स सामन्यादरम्यान, गडी पकडण्यासाठी रंगलेली चुरस. - Divya Marathi
बंगाल आणि बंगळुरू बुल्स सामन्यादरम्यान, गडी पकडण्यासाठी रंगलेली चुरस.
हैदराबाद-
मंजित चिल्लरच्या नेतृत्वाखाली बंगळुरू बुल्स संघाने गुरुवारी दुसऱ्या सत्राच्या प्रो कबड्डी लीगमध्ये विजयाचा षटकार मारला. या संघाने रंगतदार लढतीत सौरव गांगुलीच्या बंगाल वॉरियर्सचा पराभव केला. बंगळुरूच्या टीमने ३३-२२ अशा फरकाने एकहाती विजय संपादन केला. या टीमचा लीगमधील हा सहावा विजय ठरला. या विजयाच्या बळावर बंगळुरू बुल्सने तिसरे स्थान कायम ठेवले. या टीमच्या नावे आता एकूण ३० गुण झाले आहेत. दुसरीकडे सुमार खेळीमुळे बंगाल वॉ रियर्सला सातव्या पराभवाला सामाेरे जावे लागले. अजय ठाकूर (१२), मंजित (८) आणि सोमवीर (३) यांनी शानदार खेळी करून बंगळुरू बुल्सला विजय मिळवून दिला.
पाटणाचा पराभव
मेराजच्या नेतृत्वात तेलुगू टायटन्सने रंगतदार लढतीत पाटणा पायरेट्सचा धुव्वा उडवला. या टीमने ५४-३२ अशा फरकाने सामना जिंकला. राहुल चौधरी (११), दीपक हुडा (९), मेराज (११) यांच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर तेलुगूने सामन्यात पाटणाचा पराभव केला. तसेच सुकेश हेगडेने संघाच्या विजयात ६ गुणांचे योगदान दिले. त्यामुळे या टीमला एकतर्फी विजय मिळवता आला.

जयपूर-मुंबा आज झुंज
सलगच्या विजयासह लीगमध्ये आपला दबदबा निर्माण करणाऱ्या यु मुंबा टीमला पुन्हा एकदा सलामीच्या कामगिरीला उजाळा देण्याची संधी आहे. गत विजेता जयपूर पिंक पँथर्स आणि गत उपविजेता यु मुंबा यांच्यात शुक्रवारी सामना रंगणार आहे. यापूर्वी सलामीच्या लढतीत अनुपच्या नेतृत्वात मुंबा टीमने अभिषेकच्या जयपूरला धूळ चारली होती. या पराभवाचा वचपा काढण्याचा जयपूरचा प्रयत्न असेल. दुसरीकडे तेलुगू टायटन्स आणि पुणेरी पलटण यांच्यात हैदराबादच्या मैदानावर सामना रंगणार आहे.

बातम्या आणखी आहेत...