आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राे कबड्डी: बंगळुरू बुल्सचा ३१-१२६ ने विजय, पलटणविरुद्ध बंगळुरू विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलकाता- मनजितच्या नेतृत्वाखाली बंगळुरू बुल्स संघाने दुसर्‍या सत्राच्या प्राे कबड्डी लीगमध्ये शानदार विजयाची नाेंद केली. बंगळुरू संघाने शनिवारी झालेल्या सामन्यात पुणेरी पलटणचा पराभव केला. बंगळुरूच्या संघाने रंगतदार सामन्यात ३१-२६ अशा फरकाने राेमहर्षक विजय संपादन केला. या टीमचा लीगमधील हा तिसरा विजय ठरला. यासह बंगळुरू संघाने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर धडक मारली. अाता बंगळुरू संघाचे तीन विजयांसह एकूण १५ गुण झाले अाहेत. दुसरीकडे पुणेरी पलटण संघाला पराभवांची मालिका खंडित करता अाली नाही. पुण्याच्या टीमचा हा सलग चाैथा पराभव ठरला.

अाशिष चाेक्कार (७), मनजित चिल्लर (५) यांनी केलेल्या सुरेख खेळीच्या बळावर बंगळुरू संघाने सामना जिंकला. तसेच राजेश माेडाल (४), धर्मराज (३) अाणि जाेगिंदर नारवाल (२) यांनी बंगळुरू टीमच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे बंगळुरू टीमला सामन्यात विजयश्री खेचून अाणता अाली. पुणेरी पलटणसाठी वजीर (६), मनाेजकुमार (७) अाणि सागर (२) यांनी दिलेली एकाकी झंुज अपयशी ठरली. यांना पराभव टाळता अाला नाही.


जयपूर- गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्स संघाला अाता विजयी ट्रॅकवर येण्याची संधी अाहे. जयपूरचा सामना रविवारी अापल्या घरच्या मैदानावर पाटणा पायरेट्सशी हाेणार अाहे. या सामन्यात चमकदार कामगिरी करून लीगमध्ये दमदार पुनरागमन करण्याचा जयपूर टीमचा प्रयत्न असेल. या लीगमधील सामन्यांना अाता जयपूरच्या मैदानावर सुरुवात हाेणार अाहेत. यासाठी मैदाने तयार केली अाहेत.
दबंग दिल्ली विजयी
रविंदर पहालच्या नेतृत्वात दबंग दिल्ली संघाने शनिवारी विजयाची नाेंद केली. या संघाने लीगमधील अापल्या तिसऱ्या सामन्यात बंगाल वाॅरियर्सचा पराभव केला. दिल्लीच्या संघाने ३२-२१ अशा फरकाने सामना जिंकला. यासह दबंग दिल्ली संघाने लीगमध्ये दुसरा विजय संपादन केला. या विजयासह दिल्लीच्या संघाने गुणतालिकेत चाैथ्या स्थानावर धडक मारली. या संघाच्या नावे अाता एकूण १० गुण झाले अाहेत. काशीलिंग अडके (६) अाणि राेहितकुमारने (६) शानदार खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.