आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूर पँथर्सने रोखला यू मुंबाचा विजयरथ! प्रो कबड्डी लीग : जयपूरचा ३५-२५ ने विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - जसवीर सिंगच्या नेतृत्वाखाली जयपूर पिंक पँथर्स संघाने शुक्रवारी दुसऱ्या सत्राच्या प्रो कबड्डी लीगमध्ये सनसनाटी विजयाची नोंद केली. गत विजेत्या जयपूर संघाने लीगमधील गत उपविजेत्या यू मुंबा टीमचा विजयरथ रोखला. जयपूरने रंगतदार लढतीत ३५-२५ अशा फरकाने विजय मिळवला. यासह जयपूरने लीगमध्ये आपल्या नावे तिसऱ्या विजयाची नोंद केली. दुसरीकडे यू मुंबाला लीगमध्ये पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. यासह मुंबा टीमची सलामी सामन्यापासून सुरू असलेली विजयी मोहिम रोखल्या गेली.

यामुळे मुंबाची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. दुसरीकडे तिसऱ्या विजयासह जयपूरने गुणतालिकेत चौथ्या स्थानावर धडक मारली. आता मुंबाचा सामना रविवारी बंगाल वॉरियर्सशी हॉणार आहे.

सोनू नारवाल (६), कुलदीप सिंग (६) यांच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर जयपूर संघाने शानदार विजय मिळवला. याशिवाय राजेश नारवाल व रणसिंग यांनी संघाच्या विजयात प्रत्येकी चार गुणांचे योगदान दिले.

तेलुगू टायटन्स अव्वलस्थानी : फॉर्मात असलेल्या तेलुगू टायटन्सने शुक्रवारी लीगच्या गुणतालिकेत अव्वलस्थानावर धडक मारली. तेलुगू टीमने रंगतदार लढतीत पुणेरी पलटणला बरोबरीत रोखले. या दोन्ही टीममधील लढत २९-२९ अशा फरकाने बरोबरीत राहिली. पराभवाचे सावट दूर सारून तेलुगूने ४२ गुणांसह अव्वल स्थान गाठले. दुसरीकडे पुणेरी पलटणचा आठवा पराभव टळला. त्यामुळे या टीमला गुणतालिकेत एका स्थानाचा फायदा झाला. आता पुणेरी पलटण सातव्या स्थानी आहे.

पराभवाची परतफेड
गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्स संघाने शुक्रवारी हैदराबादच्या मैदानावर गत उपविजेत्या यू मुंबा टीमला पराभवाची परतफेड केली. सलामीच्या सामन्यात यजमान मुंबाने आपल्या घरच्या मैदानावर सिनेअभिनेता अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सला धूळ चारली होती. त्यानंतर आता हे दोन्ही संघ शुक्रवारी समोरासमोर आले. या वेळी जयपूरने रंगतदार सामना आपल्या नावे करून मुंबाची विजयी मोहिम खंडित केली.

पुणेरी पलटणच्या गड्याची पकड करताना तेलुगू टायटन्सचे खेळाडू.