आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कुस्ती लीग: मुंबई गरुडने बंगळुरू योद्धाजला केले चीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना - जबरदस्त फॉर्मात असलेल्या मुंबई गरुड संघाने साेमवारी प्राे कुस्ती लीगमध्ये धडाकेबाज विजयाची नाेंद केली. या टीमने सामन्यात बंगळुरूच्या याेद्धाजला अस्मान दाखवले. मंुबई संघाने ५-२ अशा फरकाने सामना जिंकून लीगमधील अापला दबदबा कायम ठेवला. मुंबई टीमचा हा सलग दुसरा विजय ठरला. विजयासह मुंबई गरुड टीमने गुणतालिकेत अव्वल स्थानावर धडक मारली. बंगळुरूच्या नरसिंग यादव अाणि बजरंगसारख्या अव्वल याेद्धाजना सामन्यात बंगळुरूचा पराभव राेखता अाला नाही. या टीमने मंुंबईविरुद्ध दाेनच कुस्त्यांत विजयश्री मिळवली.

मुंबईच्या लेवनने १२५ किलाे वजन गटाच्या पहिल्या कुस्तीत बंगळुरूच्या डेव्हिटवर ४-१ ने मात केली. यासह त्याने टीमला अाघाडी मिळवून दिली. त्यानंतर महिलांच्या ५३ किलाे वजन गटात मुंबईच्या अाेडूनायाेने बंगळुरूच्या ललिताचा १०-० ने पराभव केला. चाैथ्या कुस्तीत रितू फाेगटने बाजी मारून मुंबईचा विजयी चाैकार निश्चित केला. तिने बंगळुरूच्या एलिसाला ९-६ गुणांनी अस्मान दाखवले. ही कुस्ती अधिकच रंगतदारपणे खेळवली गेली. यात चुरशीचे डाव टाकत रितूने विजयश्री खेचून आणली.
नरसिंग यादवची प्रदीपवर मात
सलगच्या कुस्त्यातील पराभवाची मालिका माेडीत काढताना नरसिंग यादवने बंगळुरूकडून विजयाचे खाते उघडले. त्याने ७४ किलाे वजन गटात प्रदीपकुमारला ६-० ने धूळ चारली. त्यापाठाेपाठ बजरंगने ६५ किलाे वजन गटात मुंबईच्या अमितचा ६-३ ने पराभव केला.

खली, नवज्याेत सिद्धूची उपस्थिती
डब्ल्यू डब्ल्यूचा स्टार दि ग्रेट खली अाणि माजी क्रिकेटपटू नवज्याेत सिद्धूने यांच्या खास उपस्थितीने खेळाडूंचा उत्साह वाढवला. त्यामुळे मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले हाेते.

राहुल अावारेकडून संदीपचा पराभव
मुंबई टीमचा स्टार युवा खेळाडू राहुल अावारेने लीगमध्ये विजयाचे खाते उघडले. यासाठी त्याने बंगळुरूच्या संदीप ताेमरविरुद्ध धडाकेबाज विजय मिळवला. त्याने ५७ किलाे वजन गटात ५-० ने एकतर्फी विजयाची नाेंद केली. त्यामुळे त्याला मुंबईच्या विजयात माेलाचे याेगदान देता अाले.
बातम्या आणखी आहेत...