आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कुस्ती लीग: यूपी वॉरियर्सविरुद्ध पंजाबचा रॉयल विजय, ३६-२० ने जिंकला सामना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना - सलामीच्या पराभवातून सावरलेल्या पंजाब संघाने रविवारी प्राे कुस्ती लीगमध्ये राॅयल विजयाची नाेंद केली. या टीमने यूपी वाॅरियर्सचा ३६-२० अशा फरकाने पराभव केला. यासह पंजाब संघाने लीगमध्ये पहिल्या विजयाची नाेंद केली. सलामीच्या सामन्यात पंजाब राॅयल्सला मुंबई गरुड टीमने धूळ चारली हाेती. मात्र, अाता हा संघ विजयी ट्रॅकवर परतला. दुसरीकडे यूपी वाॅरियर्सचा लीगमधील हा पहिला पराभव ठरला. यापूर्वी सलामीला वाॅरियर्सने बंगळुरू याेद्धाजला पराभूत केले हाेते.
जबरदस्त फाॅर्मात अालेल्या पंजाबच्या संघाने सातपैकी सहा लढतीत राेमांचक विजय संपादन केला. पंजाबकडून रजनीश, प्रवीण राणा, माैसम खत्री, गीता फाेगट अाणि वासिलिसा मार्जाल्यूकने सनसनाटी विजयाची नाेंद केली.
रजनीशने पुरुषांच्या ६५ किलाे वजन गटात मदांखरानचा पराभव केला. तसेच प्रवीणने ७४ किलाे वजन गटात पुरेजावला धूळ चारली. माैसमने ८७ किलाे वजन गटात सत्यव्रतवर मात केली.
बातम्या आणखी आहेत...