आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाेटबंदीमुळे कुस्ती लीग स्थगित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नाेटबंदीमुळे अाता प्राे कुस्ती लीगच्या अायाेजनावरच संक्रांत अाली अाहे. यातूनच यंदाच्या सत्रातील ही लीग स्थगित करण्यात अाली. येत्या १५ डिसेंबरपासून सत्राला सुरुवात हाेणार हाेती. मात्र, अाता या स्पर्धेचे अायाेजन रद्द झाले. अाता नव्याने वेळापत्रकाची बुधवारी घाेषणा हाेण्याची शक्यता अाहे. कुस्ती लीग डिसेंबरच्या शेवटच्या अाठवड्यात अायाेजित केली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली अाहे. या लीगसाठी खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेचेही या अाठवड्यात अायाेजन करण्यात अाले हाेते. मात्र, अाता ही प्रक्रिया डिसेंबरमध्ये हाेईल. नाेटबंदीमुळे फ्रँचायझीचे अार्थिक गणित काेलमडले. याचाच फटका या लीगच्या अायाेजनाला बसला. यातूनच ही लीग तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात अाला आहे.

या लीगमध्ये बंगळुरूच्या फ्रँचायझीने माघार घेतली अाहे. कारण या फ्रँचायझीचे अायकरसंबंधीच्या कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे त्याच्या जागी जयपूर फ्रँचायझीला संधी देण्यात अाली.
बातम्या आणखी आहेत...