आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Pro Successful Modern Methods Of PresentationPro Successful Modern Methods Of Presentation Kabaddi!

आधुनिक पद्धतीच्या सादरीकरणात प्रो कबड्डी यशस्वी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘कबड्डी’ हा भारतीयांचा, भारताचा स्वत:चा खेळ. प्रत्येक स्तरावर हा खेळ कुणाच्या ना कुणाच्या आयुष्याशी निगडित होता. प्रत्येक भारतीयाला जवळचा वाटणारा हा खेळ प्रसिद्धीच्या माध्यमातून मात्र जोडला जात नव्हता. शतकांची परंपरा लाभलेल्या या भारतीयांच्या विविधांगी, विविधरंगी खेळाला आधुनिक पद्धतीने पेश करण्याचे काम स्टार स्पोर्ट््सने केले. देशाचे अनेक ‘हीरोज’ आणि हिरे अप्रकाशित होते. त्यांना प्रकाशात आणण्याचे काम स्टार स्पोर्ट््स टेलिव्हिजन वाहिनीने केले. कबड्डीच्या साम्राज्यातले अनेक सम्राट त्यांनी तमाम विश्वापुढे आणले. ‘स्टार’ने कबड्डीपटूंना स्वत:ची नवी ओळख निर्माण करून दिली. आनंद महिंद्र आणि मशाल स्पोर्ट्स क्लबच्या विचारांना मूर्त स्वरूप देण्याचे काम ‘स्टार स्पोर्ट््स’ने केले. या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे स्टार स्पोर्ट््सचे सीईओ उदय शंकर यांनी या यशाची कहाणी "दिव्य मराठी' व "दैनिक भास्कर' वृत्तसमूहासाठी उघड केली.
मीडिया आणि एंटरटेन्मेंटच्या विश्वात आपल्या कर्तृत्वाने यशाचा नवा मापदंड निर्माण करणाऱ्या उदय शंकर यांच्याशी झालेली बातचीत.
प्रश्न : प्रो कबड्डीची कल्पना कशी रुजली?
उदय शंकर : आनंद महिंद्र आणि मशाल स्पोर्ट््स हे कबड्डी खेळाच्या पुनरुज्जीवनाबाबत योजना आखत होते. त्यांची कल्पना कळताच मी स्टार स्पोर्ट््सच्या माध्यमातून काम करता येईल, याचा विचार केला आणि अल्पावधीतच ‘प्रो कबड्डी’ लीगचा जन्म झाला.
आमच्याकडे फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन या लीग सुरू होत्याच. त्याच धर्तीवर भारताच्या या प्राचीन खेळाला कसे ‘प्रमोट’ करता येईल, याचा विचार आम्ही केला. खेळाडूंना पैसा कसा मिळेल, हाही विचार केला गेला.
बातम्या आणखी आहेत...