आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्ती लीग: यूक्रेन-बेलारूसची महिला पैलवान ठरली आहे सुशील-योगेश्वरपेक्षाही महागडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या लिलावात यूक्रेनची ओकसाना हरहेल सर्वात महागडी ठरली. हरहेलला हरियाणाने 41. 30 लाख रुपयांमध्ये खसेदी केले. - Divya Marathi
या लिलावात यूक्रेनची ओकसाना हरहेल सर्वात महागडी ठरली. हरहेलला हरियाणाने 41. 30 लाख रुपयांमध्ये खसेदी केले.
नवी दिल्ली/पानीपत- प्रो कुस्ती लीगसाठी झालेल्या लिलावात महिला पैलवान पुरुषांपेक्षाही सरस ठरल्या. या लिलावात यूक्रेनची ओकसाना हरहेल सर्वात महागडी ठरली. हरहेलला हरियाणाने 41. 30 लाख रुपये आणि वेसलिसा (बेलारूस) हिला पंजाबने 40.20 लाख रुपयांत आपल्या टीममध्ये घेतले. भारताचे दोन सर्वात लोकप्रिय आेलिम्पिक पदक विजेते पैलवान योगेश्वर दत्त आणि सुशील कुमार यांनाही चांगली किंमत मिळाली. योगेश्वरला 39.70 लाख रुपयांमध्ये तर सुशीलला 38.20 लाख रुपयांत हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या संघांनी विकत घेतले आहे.
आयकॉन खेळाडूंमध्ये योगेश्वर आणि सुशीलची बेस प्राइज 33-33 लाख रुपये होती. सहा आयकॉन खेळाडूंमध्ये पैलवान नरसिंह यादव, महिला पैलवान गीता फोगाट, अमेरिकेची महिला पैलवान अॅडेलीन ग्रे आणि स्वीडनची सोफिया मॅटसन यांचा समावेश होता. अमेरिकीची पैलवान ग्रे हिला मुंबईने 37 लाख रुपयांत विकत घेतले. तर, दिल्लीने मॅटसनला तिच्या बेस प्राइसवरच खरेदी केले.
यूपीकडून खेळेल सुशील कुमार
दोन वेळा ओलिम्पिक पदक पटकावलेल्या सुशील कुमारला उत्तर प्रदेशकडून खेळणार आहे. टीमचे सर्वेसर्वा साहेल हे तर इथपर्यंत म्हमाले की, "सुशीलसाठी आम्ही 50 लाखदेखील खर्च केले असते. तो मिळाल्याने आम्ही खुश आहोत.
हरियाणाच्या हाती लागला योगी
नीलामीच्यावेळी योगेश्वर हरियाणा आणि मुंबई फ्रेंचायझीदरम्यान जबरदस्त प्रतिस्पर्धा दिसत होती. शेवटी हरियाणा टीमचे ओनर जगदीश कालीरमण यशस्वी ठरले.

6 टीम, 18 सामने, 21 दिवस
- 21 दिवस चालणार टूर्नामेंट 10 ते 27 डिसेंबर पर्यंत.
- संघ हरियाणा, पंजाब, मुंबई, उत्तर प्रदेश, बेंगलुरु आणि दिल्ली
- प्रत्येक संघात असतील पांच पुरुष व चार महिला.
- 54 खेळाडू विकले गेले, 2 कोटीत .
- 18 सामने होणार एकूण बक्षिसे तीन कोटींची.

पुढील स्लाइड्सवर पाहा, भारतीय महिला पैलवानांमध्ये बबीताला मिळाले सर्वात जास्त पैसे...