आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्ती लीग आजपासून, देशी, विदेशी मल्लांच्या कुस्त्यांचा थरार रंगणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - खेळामध्ये नव्या क्रांतीला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. कुस्ती या खेळात आता प्रीमियर लीग स्पर्धा होत आहे. देशातील पहिल्या प्रो कुस्ती लीगचा थरार गुरुवारपासून सुरू होईल. तब्बल १५ कोटी रुपये बक्षीस रक्कम असलेल्या या स्पर्धेत देश- विदेशातील अव्वल दर्जाचे मल्ल एकमेकांना चीतपट करताना दिसतील. दिल्ली वीर वि. पंजाब रॉयल्स लढतीने प्रो कुस्ती लीगला प्रारंभ होत आहे.

स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले असून भारताचे ३० आणि विदेशातील २४ मल्ल स्पर्धेत आपले नशीब आजमावतील. भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमार, योगेश्वर दत्त या स्पर्धेत सहभागी होत आहेत. हे दोघे प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतील. या दोघांशिवाय तब्बल २० ऑलिम्पिक पदक विजेते मल्ल स्पर्धेत सहभागी होत आहेत हे विशेष. या लीगची फायनल याच महिन्यात २७ डिसेंबर रोजी होईल. विजेत्या संघाला ३ कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल.
या स्पर्धेत सहा फ्रँचायझी टीम खेळतील. हे सहा संघ नवी दिल्ली, पंजाब, मुंबई, हरियाणा, बंगळुरू आणि उत्तर प्रदेश आहेत, असे स्पर्धेचे संचालक विशाल गुरनानी यांनी सांगितले. प्रत्येक शहरात एक सत्र होईल. हे तीन दिवसांचे असेल. कुस्तीप्रेमींचा स्पर्धेला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून तिकिटांची मोठ्या संख्येने विक्री होत आहे, असे त्यांनी सांगितले. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स चॅनलवर रोज होईल. या स्पर्धेचा आनंद तब्बल ६० देशांचे चाहते लुटू शकतील.
फ्रँचायझी टीमची नावे
दिल्ली वीर, हरियाणा हॅमर्स, पंजाब
रॉयल्स, यूपी वॉरियर्स, बंगळुरू योद्धाज, मुंबई गरुड.
आजचे आकर्षण
{ दिल्ली वीर : नवरुजोव इख्तियोर (उज्बेकिस्तान), पेट्रिसविली जेने (जॉर्जिया), सोफिया मॅटिसन (स्वीडन महिला) आणि विनेश फोगट (भारत, महिला).
{ पंजाब रॉयल्स : ब्लादिमीर (जॉर्जिया), जर्गलसेखन (मंगोलिया), फ्रेडरिका पीटरसन (मंगोलिया महिला), वेसिलिसा (बेलारुस).
येथे होतील सामने
{ १० ते १२ डिसेंबर, के. डी. जाधव, इनडोअर स्टेडियम, नवी दिल्ली.
{ १३ ते १५ डिसेंबर, गुरुनानक इनडोअर स्टेडियम, लुधियाना.
{ १६ ते १८ डिसेंबर, हयात रिजेंसी, गुडगाव.
{ २१ ते २२ डिसेंबर, रिलायन्स स्टुडिओ, फिल्म सिटी, मुंबई.
{ २३ ते २४ डिसेंबर, कोटामनगला स्टेडियम, बंगळुरू.
{ २५ ते २६ डिसेंबर, सेमी आणि फायनल, दिल्ली.
रोहित शर्मा कुस्ती संघाचा सहमालक
देशात पहिल्यांदा होत असलेल्या प्रो कुस्ती लीगमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा उत्तर प्रदेश वॉरियर्सचा सहमालक बनला आहे. कुस्तीला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे रोहित म्हणाला. बॉलीवूड अभिनेता धर्मेंद्रनंतर प्रो कुस्ती लीगशी जुळणारा रोहित शर्मा दुसरा मोठा सेलिब्रिटी आहे.
फायदा होईल
Ãकुस्ती लीग स्पर्धेच्या आयोजनाने देशात नव्या अध्यायाला सुरुवात हाेत आहे. या स्पर्धेमुळे कुस्तीत आणखी वाढ होईल व लोकप्रियता वाढेल. युवा खेळाडू आकर्षित होतील. या खेळात करिअरही होऊ शकते, हे लीगद्वारे सिद्ध होईल. मी स्पर्धेत खेळण्यासाठी आतुर आहे.
- सुशीलकुमार.