आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कुस्ती लीगचा थरार‌ ! कुस्तीपटूंवरही लागणार बोली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन आणि कबड्डीनंतर आता कुस्ती या खेळातही लीगची घोषणा झाली आहे. सोमवारी दिल्लीत ग्लॅमरच्या तडक्यात प्रो रेसलिंग (कुस्ती) लीगची घोषणा करण्यात आली. ऑलिम्पिक पदक विजेता सुशीलकुमारने या वेळी रॅम्पवॉक करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ही कुस्ती लीग येत्या ८ ते २९ नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाईल. यात भारताचे आणि विदेशी मल्ल अशा एकूण ६६ मल्लांसह सहा संघ असतील. लीगच्या विजेत्या संघाला ३ कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल. स्पर्धेचे बक्षीस आणि बोली मिळून एकूण रक्कम १८ कोटी रुपये आहे.

भारतीय कुस्ती महासंघ आणि प्रो स्पोर्टिफाय यांनी पत्रकार परिषदेत मल्लांच्या रॅम्प शोदरम्यान प्रो रेसलिंग लीग सुरू करण्याची घोषणा केली. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग, प्रो स्पोर्टिफायचे कार्तिकेय शर्मा, सहप्रमोटर आशिष चढ्ढा यांनी ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमारच्या उपस्थितीत लीगचा बिगुल वाजवला.

मी इतर खेळांच्या लीगबाबत बोलणार नाही. इतके निश्चित म्हणेन की, कुस्ती कोणत्याही प्रकारच्या वादात अडकणार नाही. कुस्तीला आणखी पुढे न्यायचे, हा आमचा उद्देश सरळ आणि स्पष्ट आहे. अामची भावना स्वच्छ आहे. कुस्तीला जितके सहकार्य मिळायला हवे, तेवढे मिळालेले नाही. मात्र, या खेळाला देशभरात अत्यंत आदराने पाहिले जाते. याचे श्रेय आमच्या मल्लांना दिले पाहिजे. या मल्लांनीच खेळाला बुलंदीवर पोहोचवले आहे.' कुस्ती लीगमध्ये सुशील, योगेश्वर दत्त हे दिग्गज खेळाडू खेळतील.

ऑलिम्पिक विजेतेही लढणार
प्रो लीगचे सहप्रमोटर आशिष चढ्ढा म्हणाले, "२० ऑलिम्पिक पदक विजेते आणि ८ विश्व चॅम्पियन मल्लांनी लीगसाठी हाेकार दिला आहे. लीगमध्ये खेळणा-या एकूण ६६ मल्लांत ३६ भारतीय आणि ३० विदेशी मल्ल असतील. ऑलिम्पिक विजेता सहभागी होणारी ही पहिलीच लीग असेल.'

मल्लांची बोली प्रक्रिया :
या लीगसाठी मल्लांची बोली प्रक्रिया १५ सप्टेंबर रोजी होईल. प्रो कुस्ती लीगच्या २१ दिवसांत एकूण १८ सामने होतील. यात १५ लीग गेम, दोन सेमीफायनल आणि एक फायनल असेल.

संघांची रचना अशी असेल
>एकूण सहा संघ. प्रत्येक संघात ११ कुस्तीपटू. (६ पुरुष, ५ महिला मल्ल)
>प्रत्येक संघात ६ भारतीय, ५ विदेशी मल्ल असतील
>बेस्ट ऑफ नाइन फॉर्मेटमध्ये सामने होतील
>प्रत्येक सामना तीन मिनिटांचा असेल. यात एका मिनिटाचा ब्रेक असेल.
>चितपट करणा-याला अर्धा बोनस गुण मिळेल.

लीगचा फायदा होईल

भारतीय कुस्तीच्या प्रगतीसाठी या लीगचे येणे गरजेचे होते. मी कुस्ती महासंघाचे अभिनंदन करतो. या लीगमुळे रियो ऑलिम्पिकसाठी खूप मदत होईल. ज्युनियर मल्लांनाही फायदा होईल. - सुशीलकुमार.

आकर्षक रॅम्पवॉक
या कार्यक्रमाच्या वेळी भारतीय मल्लांनी ग्रीसच्या योद्ध्याप्रमाणे वेशभूषा करून रॅम्पवॉक केला. यात पुरुष आणि महिला मल्लांचा समावेश होता. महिला मल्ल बबिता, गीतिका जाखड, गीता फोगाट, बजरंग आणि अनुज चौधरी यांनी ग्रीकच्या सैनिकांप्रमाणे पोशाख परिधान केला होता, तर युवा मल्ल शिल्पा श्योरण आणि दिव्या काकरान साडी घालून रॅम्पवर आल्या. कार्यक्रमाचे संचालन सुप्रसिद्ध अँकर सायरस भरुचा करत होते. या वेळी अपाचेने इंडियनने कुस्ती लीगचे थीम साँगही लाँच केले. भारतीय कुस्तीच्या इतिहासात ही पहिली वेळ ठरली, ज्यात या प्राचीन खेळात ग्लॅमर आणि हायव्होल्टेज संगीताचा तडका लागला. याप्रसंगी लीगचा लोगोही जाहीर करण्यात आला. या लोगोला दिल्ली कॉलेज ऑफ आर्टसच्या सहा मुलींनी संकेताच्या आधारे तयार केले.

सुशीलकुमारचा धमाका
रॅम्पवॉकमध्ये सर्वात मोठे आकर्षण दोन वेळेसचा ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमार होता. लीगच्या घोषणेनंतर नृत्य, संगीत सुरू असताना सुशीलकुमार एका मॉडेलसोबत व्यासपीठावर पोहोचला. सुशील मॉडेलसेाबत मंचावर आला, मात्र त्याला एकटे सोडून मॉडेल परतली. छायाचित्रकार आणि कॅमेरामन सुशीलला कॅमे-यात कैद करत होते. खाकी पँट आणि पिवळ्या शर्टमध्ये सुशील लाजला. सर्वांना नमस्कार करून तोही परतला. त्याने महासंघाचे आभार मानले. सुशीलकुमारच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत आली.