आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PSG ची विश्वविक्रमी डील, 5 वर्षासाठी करारबद्ध; 3102 काेटी; नेमारला मिळणार 1129 काेटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - ब्राझीलच्या सुपरस्टार नेमार ज्युनियरने फुटबाॅलच्या विश्वात अाता विक्रमी कामगिरीचा पल्ला यशस्वीपणे गाठला. पॅरिस सेंट जर्मनने (पीएसजी) या फुटबाॅलपटूसाेबत विश्वविक्रमी डील केली अाहे. पीएसजी या खेळाडूवर चक्क ३१०२ काेटी (४१२ दक्षलक्ष युराे) रुपये खर्च करणार अाहे.
 
यातून अाता नेमार हा जगातील सर्वात महागडा फुटबाॅलपटू  ठरला. बार्सिलाेनातून अाता ताे पॅरिस सेंट जर्मनसाेबत करारबद्ध झाला. या डीलमध्ये त्याने मँचेस्टर युनायटेडच्या पाॅल पाेग्बाला पिछाडीवर टाकले. पाेग्बाला युनायटेडने ८ काेटींची डील केली हाेती. पीएसजीने काेट्यवधी रुपयांचा वर्षाव करून नेमारला अापल्या संघात सहभागी केले. 
 
पेलेंनी केले काैतुक 
जगातील दिग्गज अाणि महान फुटबाॅलपटू पेले यांनीही ब्राझीलच्या नेमारचे खास शब्दांत काैतुक केले. याशिवाय त्यांनी त्याला अागामी सत्रासाठी विशेष शुभेच्छा दिल्या. ‘ प्रतिभेतून नेमारने विक्रमी डीलची नाेंद केली. यातून फुटबाॅलमध्ये युवांच्या प्रतिभेला माेठी मागणी असल्याचे दिसते. अागामी काळ सुपरस्टारचा असेल,’ असेही पेले म्हणाले.   
 
मिनिटे, तासाला सर्वाधिक महाग 
ब्राझीलचा नेमार ज्युनियर अाता जगातील सर्वाधिक महागडा फुटबाॅलपटू ठरला. त्याला मिळालेल्या विक्रमी रकमेने अनेक दिग्गज खेळाडूंचे डाेळे पांढरे झाले अाहेत.  ५३ पाउंड (मिनिट),  ३,१९७ पाउंड (तास)अाणि  ५,३७,००० पाउंड (पाच काेटी) दर अाठवड्याला त्याला मिळणार अाहे.
 
पुढील स्लाइडवर वाचा, जगभरातील सर्वाधिक महागडे टाॅप-५ फुटबाॅलपटू...    
बातम्या आणखी आहेत...