आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या चीनचं करायचं काय? नव्या नोटा अजून मिळाल्याही नाहीत तोवर बनवल्या पर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- या चीनचे खरंच करायचं काय असा सवाल जगाला आगामी काळात भेडसवणार आहे. जगातील सगळ्या वस्तूंचे डुप्लीकेट तयार करायला चीनचा हात कोणीच धरणार नाही. आता ताजे उदाहरण पाहा. भारतातील जुन्या 500 आणि 1000 च्या नोटा बंद होऊन 10 दिवस झाले आहेत. लोक पैशांसाठी एटीएम आणि बॅंकेबाहेर रांगा लावत आहेत तरीही त्यांना मिळत नाहीत. 500 ची नवी नोट अजून सामान्यांना पाहायला मिळाली नाही तोवर चीनने नव्या नोटांच्या डिझाईनच्या पर्स बाजारात आणल्या आहेत. या पर्सचे फोटोज सोशल मीडियात वेगाने वायरल होत आहेत. भारतीय बाजारपेठेत वेगाने होतेय विक्री...
- मुंबई आणि गुजरातमधील अनेक शहरात चीनमधून नुकत्याच आलेल्या नव्या नोटांच्या डिझाईनच्या पर्स फुटपाथवर दिसत आहेत.
- पर्स खरेदी करणा-या लोकांचे म्हणणे आहे की, आता आमच्याकडे जुन्या नोटा राहिल्या नाहीत, सर्व बॅंकेत जमा केल्या आहेत.
- मात्र, जुन्या नोटांच्या डिझाईन असणा-या यी पर्समध्ये नव्या नोटा ठेवायला मजा येत आहे.
- याचे डिझाईन सुद्धा असे काही, जेव्हा ती पर्स खोलता तेव्हा त्यातून नोटाचे बंडल काढतोय असे वाटते.
- या पर्सची किंमतही तशी फारशी नाही. इतर पर्सप्रमाणेच ती फक्त 30 रुपयात मिळत आहे.
- याचमुळे लोक मोठ्या प्रमाणात ही पर्स खरेदी करत आहेत.
अशा आल्या कमेंट्स...
- आशिष नावाचा एक यूजर लिहतो, ‘भारतात जेवायला सुद्धा नोट मिळत नाही मात्र चायनाने नोट पर्सवर छापली.’
- अमित नावाचा यूजर लिहतो, ‘भारत सरकार नोट छापण्यासाठी अजून संघर्ष करत आहे तर चायनाने पर्स छापल्या सुद्धा आणि भारतात पोहचवल्या सुद्धा.’
- आदित्य नावाचा यूजर म्हणतो, ‘1947 पासूनच चीन भारताला प्रत्येक बाबतीत धोबीपछाड देत आला आहे.’
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, चायनीज पर्सचे फोटोज आणि यूजरनी केलेल्या कमेंट्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...