आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजपासून हाँगकाँग ओपन; वर्ल्ड सिरीजचे सिंधूचे लक्ष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेवलून - चीन अाेपनची चॅम्पियन सिंधू अाता डिसेंबरमध्ये हाेणाऱ्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनल्समधील प्रवेश निश्चित करण्यासाठी सज्ज अाहे. यासाठी तिचा हाँगकाँग अाेपन बॅडमिंटन स्पर्धेत सरस कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. या स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात हाेत अाहे. सिंधूला या स्पर्धेतील अव्वल कामगिरीच्या बळावर वर्ल्ड टूरचे तिकीट मिळवता येईल. तिने रविवारी अापल्या करिअरमध्ये पहिल्या सुपर सिरीज किताब जिंकला. जागतिक स्पर्धेतील दाेन वेळच्या कांस्यपदक विजेत्या सिंधूला हाँगकाँग अाेपनमध्ये सरस कामगिरीची अाशा अाहे.

सिंधूचा पहिला सामना इंडाेनेशियाच्या लिंडवेनी फानेत्रीशी हाेईल. सायना नेहवालला सुद्धा या स्पर्धेत चांगल्या प्रदर्शनाची आशा आहे. तिच्यापुढे थायलंडच्या बुरानाप्रार्सेतुकचे आव्हान असेल.
बातम्या आणखी आहेत...