आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पी.व्ही.सिंधूवर बक्षिसांचा वर्षाव, हरियाणा 4, आंध्र 3 तर दिल्लीकडून 2 कोटी रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू भारताचा ध्वज उंचवताना.... - Divya Marathi
रिओ ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू भारताचा ध्वज उंचवताना....
नवी दिल्ली- स्टार शटलर पी व्ही सिंधूने ऑलिंपिकमधील सिल्वर मेडल जिंकल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने तिला 50 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले. तर हरियाणा सरकारने सिंधूला 4 कोटी रूपये देण्याची घोषणा केली. याशिवाय भारत सरकार, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया, रेल्वे मिनिस्ट्री, इंडियन ऑलिंपिक असोसिएशन आणि बॉलिवूड अॅक्टर सलमान खानने सुद्धा सिंधूला बक्षिस जाहीर केले आहे. फायनलमध्ये हरली सिंधू...
- अंतिम लढतीत स्पेनच्या कॅरोलिना मारिनने सिंधूला 2-1 असे हरवत सुवर्णपदक जिंकले.
- सिंधू, ऑलिंपिकमध्ये मेडल जिंकणारी सर्वात तरूण भारतीय खेळाडू ठरली आहे.
- सिंधूने पहिला सेट 21-19 असा जिंकला पण कॅरोलिनाने दूस-या सेटदरम्यान जोरदार कमबॅक करीत 21-12 अशी बरोबरी साधली.
- तिसर-या सेटमध्ये सिंधूला 21-15 असा गमवावा लागला.
ऑलिंपिक मेडल जिंकणारी भारताची पाचवी महिला
- कर्णम मल्लेश्वरी: वेटलिफ्टिंग: ब्राँझ: 2000 (सिडनी)
- मेरी कॉम: बॉक्सिंग: ब्राँझ: 2012 (लंडन)
- सायना नेहवाल: बॅडमिंटन: ब्राँझ: 2012 (लंडन)
- साक्षी मलिक: रेसिलंग: ब्राँझ: 2016 (रिओ)
- पी व्ही सिंधू: बॅडमिंटन: सिल्वर: 2016 (रिओ)
सिंधूने ऑलिंपिकच्या इतिहासातील 6 वे रौप्य मिळवून दिले भारताला
- 1900, पॅरिस : मूळ ब्रिटिश असलेल्या नॉरमन प्रिटचर्ड यांना 200 मीटर आणि 200 मीटर हर्डल्समध्ये 2 सिल्वर.
- 2004, अथेन्स : राज्यवर्धन सिंह राठोड यांना शूटिंगमध्ये
- 2012, लंडन : विजय कुमारला शूटिंगमध्ये तर सुशील कुमारला रेसलिंगमध्ये
- 2016, रिओ : पी व्ही सिंधूला बॅडमिंटनमध्ये...
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सिंधूला आणखी कोणी-कोणी किती जाहीर केलेय बक्षीस...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...