आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • PV Sindhu Inspires Chennai Smashers To A 4 3 Win Over Delhi Acers At PBL

चेन्नई स्मॅशर्सकडून दिल्ली टीमचा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- फॉर्मात असलेल्या चेन्नई स्मॅशर्स संघाने मंगळवारी पहिल्या सत्राच्या प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये (पीबीएल) विजयाची नाेंद केली. या टीमने लीगमधील अापल्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली एसर्सचा पराभव केला. चेन्नई टीमने ४-३ ने राेमहर्षक विजय अापल्या नावे केला.

चेन्नईचा लीगमधील हा सलग दुसरा विजय ठरला. या टीमने सलामीला लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर अक्षयकुमारच्या मुंबई राॅकेट्सचा पराभव केला हाेता. तसेच दिल्लीचा सलग दुसरा पराभव ठरला. यापूर्वी दिल्लीच्या टीमला सायनाच्या वाॅरियर्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईकडून प्रणय जेरी चाेप्रा क्रिस अॅडकाॅक यांनी विजयी सलामी दिली. त्यांनी दुहेरीत दिल्लीच्या कु केएट किइन अाणि तान बुनवर १५-१२, १५-१४ ने मात केली.

दुसरीकडे अजय जयरामने दमदार पुनरागमन करताना दिल्लीची बाजू सावरली. त्याने पुरुष एकेरीच्या लढतीमध्ये चेन्नईच्या सायमन सांताेसाेला पराभूत केले. यजरामने सरस खेळी करून १५-६, १५-९ अशा फरकाने विजयाची नाेंद केली. त्यामुळे दिल्लीच्या सामना जिंकण्याच्या अाशा पल्लवित झाल्या. मात्र, त्यानंतरच्या लढतीत दिल्ली टीमचे खेळाडू सपशेल अपयशी ठरले.

सिंधूचा विजय
जागतिकक्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या सिंधूने चेन्नईसाठी महिला एकेरीचा सामना जिंकला. तिने दिल्ली संघातील खेळाडू पी. सी. तुलसीवर सहज सरळ दाेन गेममध्ये मात केली. तिने १५-५, १५-४ ने सामना जिंकला. दरम्यान, युवा खेळाडू तुलसीने शानदार खेळी करताना सिंधूला राेखण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तिने दुसऱ्या गेममध्ये सिंधूसाठी चाेख प्रत्युत्तराची खेळी साकारली हाेती.
बातम्या आणखी आहेत...