आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PV Sindhu, Kidambi Srikanth Advance To Second Round At Denmark Open

सिंधूची विजयी सलामी; कश्यप, श्रीकांतचा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओेडेन्से- वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दोन वेळची कांस्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने गुरुवारी डेन्मार्क ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. दुसरीकडे पी. कश्यप, पाचवा मानांकित के. श्रीकांत आाणि प्रणयचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

भारताच्या सिंधूने महिला एकेरीच्या सलामी सामन्यात कुसुमस्तुतीचा पराभव केला. तिने २१-१३, २१-११ अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. तिने दमदार खेळी करताना अवघ्या ३३ मिनिटांमध्ये विजय साकारला. आता दुसऱ्या फेरीत तिचा सामना तिसऱ्या मानांकित तेई जू यिंगशी होईल.

श्रीकांत ३९ मिनिटांत पराभूत
भारताचा अव्वल युवा खेळाडू सलामी सामन्यात अवघ्या ३९ मिनिटांमध्ये पराभूत झाला. त्याला इंडोनेशियाच्या टॉमी सुर्गितोने सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. बिगर मानांकित सुर्गिनोने २१-१५, २१-१७ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नोंद केली. याशिवाय त्याने पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठून आगेकूच कायम ठेवली आहे.

वेईकडून कश्यपचा पराभव
आठव्या मानांकित पी. कश्यपला पराभवाचा सामना करावा लागला. जगातील माजी नंबर वन ली चोंग वेईने सलामीला कश्यपचा पराभव केला. त्याने ४७ मिनिटांमध्ये २१-१४, २१-१५ अशा फरकाने सलामीचा सामना जिंकला.

श्रीकांत, प्रणय बाहेर
चीन-तैपेईच्या सू जेन हाओेने पुरुष एकेरीच्या सलामीला भारताच्या प्रणयला धूळ चारली. त्याने २१-२३, २१-१९, १५-२१ अशा फरकाने सामना जिंकला. भारताच्या खेळाडूने एक तास २१ मिनिटे विजयासाठी शर्थीची झुंज