आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड बॅडमिंटन चँपियनशिप : पीव्ही सिंधूची क्वार्टर फायनलमध्ये धडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ताः भारताची स्टार बॅडमिंटन चँपियन पीव्ही सिंधू वर्ल्ड बँडमिंटन चँपियनशिपच्या महिला एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली आहे.
सिंधूने इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे सुरू असलेल्या टोर्नामेंटमध्ये जगातील क्रमांक -3ची स्टार बॅडमिंटन चँपियन ली ज्युरुई हिला 21-17, 14-21, 21-17 अशा फरकाने हरवले. साधारणपणे 50 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधूने रोमांचक खेळ केला. ली जुरुई हिने दुसर्‍या डावात आघाडी घेण्याचा चांगलाच प्रयत्न केला, मात्र ती अपयशी ठरली. सिंधूने चांगला खेळ करत तिला रोखले.
या विजयानंतर आता सिंधूने ली ज्युरुईशी बरोबरी साधली आहे. या दोघीही आतापर्यंत चार वेळा आमनेसामने आल्या आहेत. यानंतर आता दोघीही दोन-दोनने बरोबरित आहेत.
चँपियन पीव्ही सिंधूने वर्ल्ड बंडमिंटन चँपियनशिपमध्ये 2013 आणि 2014मध्ये सलग दोन वेवा कांस्य पदक जिंकले आहेत. या टोर्नामेंटच्या एकेरीत पदक जिंकणारी सिंधू एकमेव भरतीय खेळाडू आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, चँपियन पीव्ही सिंधूचे काही निवडक फोटो़ज....