आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाँगकाँग ओपन : पी.व्ही. सिंधू, समीरचा फायनलमध्ये पराभव!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोऊलून - ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि समीर वर्मा यांचा हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभव झाला. सिंधूला फायनलमध्ये चौथी मानांकित तैयपैच्या तेई जू यिंगकडून पराभवाचा सामना केला. यामुळे तिचे सलग दुसरे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जू यिंगने चायना ओपन जिंकणाऱ्या सिंधूला ४१ मिनिटांत २१-१५, २१-१७ ने हरवले.

सिंधूच्या पराभवानंतर समीर वर्माचासुद्धा फायनलमध्ये पराभव झाला. सेमीत तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू डेन्मार्कच्या जॉन ओ जाेर्गेनसला हरवणाऱ्या समीरला हाँगकाँगच्या लोंग एंगसने ५० मिनिटांत संघर्षपूर्ण फायनलमध्ये २१-१४, १०-२१, २१-११ ने मात दिली.
विश्व क्रमवारीत नवव्या क्रमांकावरी सिंधूची फायनलमध्ये चांगली सुरुवात झाली नाही. यू जिंकने लगेचच ६-३ ने आघाडी घेतली. सिंधूने नंतर ६-६ अशी बरोबरी केली. मात्र, सेमीफायनलमध्ये जगातील नंबर आणि ऑलिम्पिक चॅम्पियन स्पेनच्या कॅरोलिना मरिनला हरवणाऱ्या यिंगने ८-७, १५-८ ची आघाडी घेतला पहिला गेम २१-१५ ने जिंकला. यिंगने ७-८ अशा स्कोअरनंतर सलग ८ गुण मिळवत सिंधूवर मानसिक दबाव आणला.

दुसऱ्या गेममध्ये सिंधूने ४-१ ने आघाडी घेतली. मात्र, तैयपैच्या खेळाडूने सलग चार गुण घेत स्कोअर ५-४ असा केला. दुसऱ्या गेममध्ये दोघी एकवेळ १०-१० अशा बरोबरीत होत्या. नंतर यिंगने १७-१३ अशी आघाडी घेतली. पुढे तिने २१-१७ ने गेमसह सामना जिंकला. यिंगने या विजयासह सिंधूविरुद्ध आपला रेकॉर्ड ५-३ असा केला आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाच्या प्रवासात सिंधूने यिंगला हरवले होते, हे विशेष. पुरुष एकेरीत समीरने संघर्ष केला. मात्र, तो विजेतेपद मिळवू शकला नाही.
बातम्या आणखी आहेत...