आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कुस्ती लीग : विराट कोहलीचा संघ विजयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय कसोटी टीमचा कर्णधार कोहलीच्या बंगळुरू योद्धाज टीमने शुक्रवारी प्राे कुस्ती लीगमध्ये विराट विजयाची नोंद केली. यासह बंगळुरू टीमने लीगमधील आपल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. युवा कुस्तीपटू नरसिंग यादवच्या नेतृत्वाखाली बंगळुरू टीमने अापल्या पहिल्या सामन्यात सुशील कुमारच्या यूपी वाॅरियर्सला ६-१ अशा फरकाने धाेबीपछाड केले. खाशाबा जाधव स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात बंगळुरू संघाने ३६ गुणांची कमाई केली. मात्र, वाॅरियर्सला अवघ्या १९ गुणांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरूच्या मल्लांनी सातपैकी सहा सामन्यांत विजयाची नोंद केली.
सुशीलकुमारची माघार
ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमारने या लीगमधून माघार घेतली. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी आपण माघार घेत असल्याचे कारण त्याने आयोजकांना दिले. मात्र, या लीगदरम्यान आयोजकांनी केलेल्या गैरवर्तनामुळे त्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.