आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील, सासऱ्यांचा वेगाने गाडी चालवण्यास विराेध, रेसर हाेण्याचे केले हाेते निश्चित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव- रेसिंग केल्याने मुलीला गंभीर दुखापत हाेण्याची वडिलांना भीती हाेती. दुसरीकडे सून कार चालवायला लागल्यानंतर समाज काय म्हणेल, याची सासऱ्यांच्या मनात भीती हाेती. मात्र, ती तर रेसिंगसाठी वेडी झालेली हाेती. कारचे स्टेअरिंग अाणि एक्सिलरेटर तिचा अात्मविश्वास द्विगुणित करत हाेता. त्यामुळे तिने हा रेसिंगचा छंद जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवला. ही संघर्षमय कहाणी महिला रेसर बानी यादवची अाहे. तिने अनेक अडचणींवर मात करत हे यश संपादन केले.

चाेरून कार काढत हाेती अाणि चक्कर मारून पुन्हा ठेवून देई
माझे बालपण हे लखनऊमध्ये गेले. वडील हे भरधाव वेगाने गाडी चालवत असत. अापणही वेगाने गाडी चालवण्याची माझीही इच्छा हाेऊ लागली. वयाच्या १३ व्या वर्षी मी कार रेसर हाेण्याचे स्वप्न पाहिले. मात्र, अापण रेससाठी कार चालवावी, असे वडिलांना कधीही वाटत नसे. त्यामुळे मला सक्त मनाई हाेती. मात्र, मी गुपचूप घरातून कार काढत असे, त्यानंतर तिचा एक चक्कर मारून पुन्हा घरी अाणून ठेवत असे. हे असेच सुरू राहिले अाणि मी सुपरस्टार रेसर बनली.

माेठी झाल्यावर मी काॅलेजच्या िमत्राशी लग्न गेले. अाणि बानी माथूरची मी बानी यादव झाली. माझे सासर हे गुडगावनजीकच्या मानेसरचे अाहे. सासरच्यांकडून मला यासाठी प्राेत्साहन मिळेल, असे वाटत हाेते. मात्र, असे झाले नाही. कारण, समाजाच्या भीतीने सासऱ्यांनी चक्क कार चालवण्यास विराेध केला. कुटुंबीयांत मी एकटीच कार चालवणारी हाेती. त्यामुळे मला कार चालवण्यास मनाई करण्यात अाली. मात्र, जिद्दीने मी कुटुंबीयांचे मन वळवले अाणि कार रेसिंगमधील अापला छंद जाेमाने जाेपासला. दाेन मुलांच्या पालनपाेषणानंतर मला पतीने कार रेसिंग रॅलीमध्ये सहभागी हाेण्याची परवानगी दिली. त्यानंतर मी कधीही मागे वळून पाहिले नाही. एकापाठाेपाठ मी कार रॅलीमध्ये यश संपादन करत गेली. डिसेंबरमध्ये मी चिकमंगुरमधील इंडियन कार रॅली चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला हाेता. पुरुषांच्या रेसमध्ये तिसऱ्या स्थानी धडक मारली. देशातील सर्वात फास्टेट कार ड्रायव्हरचा किताबही मी पटकावला. अाता वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे स्वप्न अाहे, असेही या वेळी रेसर बानी यादवने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...