माँट्रियल - इंग्लंडच्या अँडी मरेने राॅजर्स चषक पटकावला. यासह त्याने अागामी अमेरिकन अाेपन टेनिस स्पर्धेच्या जेतेपदासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. त्याने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकचा पराभव केला. मरेने रंगतदार लढतीत ६-४, ४-६, ६-३ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. या पराभवासह नंबर वन याेकाेविकला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याने दमदार खेळी करून दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले हाेते.
मात्र, त्याला तिसऱ्या अाणि निर्णायक सेटमध्ये अापली लय कायम ठेवता अाली नाही. याचाच फायदा घेत इंग्लंडच्या मरेेने तिसऱ्या सेटमध्ये बाजी मारून अंतिम सामना अापल्या नावे केला. येत्या ३१ अाॅगस्टपासून अमेरिकन अाेपन टेनिस स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. राॅजर्स चषक पटकावून मरेने अागामी स्पर्धेसाठी कसून तयारी केल्याचे दाखवून दिले.
क्रमवारीत दुसऱ्या स्थानी धडक
राॅजर्स चषक टेनिस स्पर्धेची फायनल जिंकून इंग्लांडच्या मरेने डबल धमाका उडवला. त्याने पुरुष एकेरीच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर धडक मारली. यासह राॅजर फेडररची क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरण झाली.
प्रशिक्षकांना चषक समर्पित
इंग्लंडच्या मरेने जेतेपद प्रशिक्षक एमेली माेरेस्माे यांना समर्पित केले. माेरेस्माे यांनी मरेने जेतेपद जिंकल्यानंतर अवघ्या काही तासांत एका गाेंडस बाळाला जन्म दिला. त्यामुळे मरेने जेतेपद समर्पित करून माेरेस्माेच्या मातृत्वाचा अानंद द्विगुणित केला.
युकी भांबरीला उपविजेतेपद
अॅप्टाेस - भारताचा युवा खेळाडू युकी भांबरीचे अाठवड्याच्या अंतरात अजिंक्यपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. त्याला एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यासह त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अव्वल मानांकित ख्रिस अाणि अार्टेम सितेकने पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. अाॅस्ट्रेलियन-किवीच्या या जाेडीने ६-४, ७-६ अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. युकी भांबरीने अापला अाॅस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यूज एबडेनसाेबत पुरुष दुहेरीचा किताब जिंकण्यासाठी शर्थीची झुंज दिली.
बेथानी-सफाराेवाला महिला दुहेरीचे अजिंक्यपद
बेथानी माटेक सॅण्ड अाणि लुसिया सफाराेवाने महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. या जाेडीने अंतिम सामन्यात गार्सिया अाणि स्रेबाेटनिकचा पराभव केला. त्यांनी ६-१, ६-२ अशा फरकाने विजयासह अजिंक्यपद पटकावले. विजेत्या जाेडीने दमदार सुरुवात करताना सामन्यात अापला दबदबा निर्माण केला. त्यामुळे त्यांना एकतर्फी विजय मिळवता अाला.
बेलिंडा बेनसिस चॅम्पियन
स्विसची युवा खेळाडू बेलिंडा बेनसिस महिला एकेरीत चॅम्पियन ठरली. तिने दुसऱ्या मानांकित सिमाेना हालेपचा पराभव करून जेतेपद अापल्या नावे केले. राेमानियाच्या हालेपला दुखापतीमुळे तिसऱ्या सेटमधून माघार घ्यावी लागली. या वेळी बेलिंडाने ३-० ने अाघाडी मिळवली हाेती. यासह तिने ७-६, ६-७,३-० ने सामना अापल्या नावे केला. उपांत्य लढतीत जगातील नंबर वन सेरेनाला पराभूत करून बेलिंडाने किताबावरचा अापला दावा अधिक मजबूत केला हाेता.
ब्रायन बंधूंना पुरुष दुहेरीचे विजेतेपद
अमेरिकेच्या बाॅब अाणि माइक या ब्रायन बंधूंनी शानदार खेळी करून राॅजर्स चषक टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. या जाेडीने अंतिम सामन्यात डॅनियल नेस्टर अाणि एडवर्ड राॅजर वेस्लिनचा पराभव केला. ब्रायन बंधूंनी सरस खेळी करून ७-५, ३-६, १०-६ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. पहिल्या सेटवर वरचढ ठरलेल्या ब्रायन बंधूंना दुसऱ्या सेटमध्ये सुमार खेळीचा फटका बसला. मात्र, या जाेडीने तिसऱ्या सेटमध्ये बाजी मारून सामना अापल्या नावे केला.