आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rafael Nadal Beats Gael Monfils In Mercedes Cup, Stuttgart

मर्सिडीझ अाेपन टेनिस स्पर्धा; राफेल नदाल अंतिम फेरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टुटगार्ट - जगातील माजी नंबर वन राफेल नदालला मर्सिडीझ अाेपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा किताब जिंकण्याची संधी अाहे. त्याने शनिवारी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. दाेन वेळच्या विम्बल्डन चॅम्पियन नदालने एकेरीच्या उपांत्य सामन्यात फ्रान्सच्या गेल माेफिल्सचा पराभव केला. त्याने ६-३, ६-४ ने विजयाची नाेंद करत फायनलचे तिकीट मिळवले.
पराभवासह फ्रान्सच्या गेल माेफिल्सला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. या वेळी त्याने जगातील माजी नंबर वन खेळाडूला राेखण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला. दमदार सुरुवात करत स्पेनच्या नदालने पहिल्या सेटमध्ये सहज बाजी मारली. यासह त्याने लढतीमध्ये अाघाडी घेतली. त्यानंतर त्याने दुसरा सेट जिंकून सामना अापल्या नावे केला.